pooja thombre engagement News

Engagement News   झी  मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियदारी’ या लोकप्रिय मालिकेत मुंबईत एकाच प्लॅटमध्ये भाड्याने राहणार्‍या सहा मित्रांची ही गोष्ट आहे. Engagement News Pooja thombre  हे साही मित्र फक्त रूम शेयर करत नाहीत तर ते त्यांचे जीवन, एकमेकांची सुख-दुःखेपण शेयर करतात. यामध्ये  ॲना ही ड्रेसडिझायनर चे पात्र होते .

या लोकप्रिय मालिकेतील  प्रत्येकाच्या अभिनयाने  मनात घर केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. Engagement News anna मालिकेत असंख्य प्रश्न विचारून गोंधळ घालणारी ऍना म्हणजे अभिनेत्री पूजा ठोंबरे ही खास होती. या पूजा ठोंबरेचा नुकताच साखरपुडा झाला आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पूजाने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. पूजा ठोंबरेचा नामपूर येथे 14 डिसेंबर रोजी कुणाल अहिररावसोबत साखरपुडा पार पडला आहे. पूजाने दोघांचे साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून अभिनेत्री आरती वडगबाळकर हिचे आभार मानले आहेत. आरतीने पूजा आणि कुणाल या दोघांचे कपडे डिझाईन केले आहेत.

View this post on Instagram

Bhaubijechya Khup Shubheccha..😘😘😘

A post shared by Kunal Ahirrao (@ahirrao.kunal) on

साखरपुड्याचा हा सोहळा अतिशय खासगी आणि कौटुबिंक पद्धतीने पार पडला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता हे दोघं कधी लग्न करणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.

मृणाल दुसानिसचे नवऱ्या सोबतचे न पाहिलेले फोटोज् पाहा..

पूजा ठोंबरेने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेनंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकांत काम केलं आहे. पूजा मुळची औरंगाबाद येथील बीड जिल्ह्यातील आहे. बीडच्या केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी आहे.

पूजाने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सायली संजीव, ऋजुता बागवे, उर्मिला निंबाळकर, इशा केसकर, मंजिरी ओक, वैभव चिंचाळकर, अश्विनी केसकर यांच्यासह अनेकांनी पूजाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साखरपुड्याच्या फोटोत पूजा आणि कुणाल दोघेही अतिशय सुंदर दिसत आहे. साखरपुड्याला पूजाने पारंपरिक साडी परिधान केली तर कुणाल पुणेरी पगडीत दिसतोय.

कुणालच्या फेसबुक पेजवर त्याचे आणि पूजाचे जुने फोटो बघायला मिळतात. यावरुन हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे समजते. कुणाल हा सुद्धा कलाक्षेत्रात कार्यरत आहे.

माहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *