Raj hanchnale wedding सध्या सोशल मीडिया वर सगळीकडे लग्नाच्या बातम्या ऐकण्यात येत आहेत. Raj hanchnale wedding कारण हिंदू प्रथेनुसार तुळशी विवाहानंतर लग्नाच्या शुभ तारखा सुरू होतात. साहजिकच, अनेक जण या काळात विवाहबंधनात अडकतात. आता एक मराठी अभिनेता देखील लग्नाच्या बेडीत अडकला आहे. तो अभीनेता म्हणजेच तुझ्यात जीव रंगला मालिकेतील सनी.
तुझ्यात जीव रंगला मालिकेत नंदिताच्या नवऱ्याचा म्हणजेच राणा च्या भावाचा अभिनय करणाऱ्या सनी म्हणजेच राज हंचनाळे याने नुकतेच लग्न केले आहे. 6 वर्ष प्रेमात राहिल्यानंतर राजने हरियाणा ची मुलगी मनीषा उर्फ मॉली डेस्वाल सोबत लग्न केले आहे. Raj hanchnale Marriage मनीषा ही मूळची हरियाणाची असली तरी ती मुंबई येथे राहायची. 14 एप्रिल 2013 पासून राज आणि मनीषा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 6 वर्षाच्या प्रेमाचे रूपांतर दोघांनी लग्नात केले आहे. Raj hanchnale Marriage दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
एका फोटो मध्ये तर असे “दोस्तीचे प्रेम 2013”, “लग्नाचे प्रेम 2019” असे लिहिलेले पोस्टर दाखवीत आहेत दोघे. मनीषा ही अभिनेत्री नसून ती एक फिटनेस ट्रेनर आहे. तसेच ती एक 2D अॅनिमेटर देखील आहे. दोघांनीही वेळोवेळी आपल्या प्रेमाला जगासमोर आणले आहे. भावी आयुष्यासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा..
माहिती आवडली तर नक्की शेयर करा