Sandhya Manik टेलिव्हिजन वरील मालिका मध्ये कट कारस्थाने असतील तरच मालिके मध्ये जीव येतो असा जणू दिग्दर्शक व लेखकांमध्ये समज असतो. त्यात मग मराठी मालिका पण मागे नाहीत. झी मराठीवरील “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत पण सध्या हेच चालू आहे.अगोदर नंदिता नावाच्या पात्राने राणा व अंजलीच्या जीवनात अडथळे निर्माण केले. आता असेच एक नवीन पात्र आले होते. माधुरी नावाचे हे पात्र तिच्या अशाच कामामुळे चांगलेच चर्चेत आहे. तीचा मुले पळवून नेण्याचा प्लॅन राजलक्ष्मीने हा प्लॅन सपशेल मोडून टाकला. म्हणजेच माधुरी नावाचे पात्र नंदिता वहिनी सारखेच नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.
मालीकेत ज्या अभिनेत्रीने माधुरी नावाचे पात्र साकारले आहे तीचे खरे नाव संध्या माणिक आहे. Sandhya Manik latest Photos आज आपण तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात.
तुझ्यात जीव रंगला ही मालिका कोल्हापूर च्या मातीतील असल्याने व मालिकेचे चित्रिकरण खेडेगावात असल्याने माधुरी म्हणजेच संध्याचा लुक एकदम साधा दाखविण्यात आला आहे. Sandhya Manik latest मालिकेत जरी ती तशी दिसत असली तरी ती खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मॉडर्न आहे. संध्या मूळची नवी मुंबई ची असून नेरुळ येथील डी वाय पाटील लॉ कॉलेजमधून तिने वकिलीचे शिक्षण घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या “अहिल्या” या चित्रपटात संध्याने अत्यंत सुंदर भूमिका निभावली होती.
प्रिया बेर्डे यांच्या सुनेची भूमिका या चित्रपटात संध्याने केली होती. तसेच संजय जाधव यांनी दिग्दर्शन केलेला ‘गुरू’ चित्रपटात संध्या हिने अत्यंत महत्वाची भूमिका साकारली होती. तिने हिंदी चित्रपटात पण काम केले आहे. ‘कलंक’ या बॉलिवूड चित्रपटात देखील तिने छोटासा रोल केला होता. तसेच “प्रेमात रंगले सारे” या विनोदी मराठी नाटकात पण तीने काम केले आहे.
संध्या च्या अभिनय क्षेत्राला खरे यश चित्रपट “अहिल्या” आणि मालिका “प्रेमात रंगले सारे” यातून मिळाले होते. पण एखादा कलाकार जेंव्हा झी मराठी या वाहिनीवर येतो तेंव्हा तो खऱ्या अर्थाने फेमस होत असतो. तसेच संध्या माणिक सोबत घडले आहे. मालिकेतून दिसणारी माधुरी आता महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. यापुढे मालिकेत ती आणखीन कोणते कारनामे करेल हे पाहणे रंजक ठरेल. कोणत्याही कलाकाराला व्हीलन ची भूमिका साकारणे अवघडच असते. पण हे माधुरी उत्तमरित्या निभावताना दिसत आहे. संध्या माणिक ला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
देवयानी फेम अभिनेत्रीचे या मालिकेतून जोरदार कमबॅक
माहिती share करायला विसरू नका ……..