Saurabh katara shahid news

राजस्थान च्या भरतपूर जिल्ह्यातील बरौली ब्राम्हण गावचा सुपुत्र कश्मीर मधील कुपवाड येथे झालेल्या बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले.
16 नोव्हेंबर ला एक महिन्याच्या सुट्टीवर घरी आले होते.23 नोव्हेंबर ला आपल्या बहिणीचा विवाह पार पाडला.Saurabh katara News त्यानंतर उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील अनुक्रमे पूनम आणि पूजा या दोन बहिणींसोबत 8 डिसेंबर 2019 .रोजी सौरभ कटारा व त्यांचे मोटे भाऊ यांचा विवाह एकाच वेळी पार पडला होता.

Saurabh katara shahid news

यांच्यासोबत शहीद सौरभ यांनी आयुष्यभर साथ देण्याच्या वाचन हि घेतले. पण विवाहानंतर त्यांना केवळ १७ दिवसांचंच आयुष्य मिळेल, हे कुणाला माहीत होतं. पूनमच्या हातावरची मेहंदीही नीटशी निघाली नसेल आणि त्याच हातांनी शहीद पतीच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ तिच्यावर आली. शहीद सौरभ यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतानाही पूनम या भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्या.

“उन आँखो की दो बूंद से,
समन्दर भी हारे होंगे।
जब मेहंदी वाले हाथों ने
अपना मगंलसूत्र उतारे होगें।”

शहीद सौरभ कटारा यांच्या पार्थिवावर सैन्य सन्मानासोबत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शहीद सौरभ यांचा पार्थिव देह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना त्यांची पत्नी पूनम कटारा यांनी आपला खांदा दिला. यावेळी, दुखावेगानं त्यांना भोवळ येत होती… त्यांचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते.

पूनम ने ठामपणे आपल्याला १७ दिवसांसाठी का होईना पण शहीदाची पत्नी असण्याचा आपल्याला गर्व असल्याचं म्हटलं. Saurabh katara पतीनं देशासाठी प्राणांची आहुती दिल्याचा अभिमान पूनमला आहे.

सौरभ कटारा सोमवारी-मंगळवारी कूपवाडामध्ये झालेल्या स्फोटात शहीद झाले. ते भारतीय लष्करामध्ये चालक पदावर कार्यरत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी २०० फिल्ड रेजीमेंटपासून देशसेवेला प्रारंभ केला होता. घटना घडली त्यावेळी कार्बाइन घेऊन ते श्रीनगरहून कूपवाडाला जात होते. कूपवाडाजवळच्या त्यांच्या गाडीवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड फेकण्यात आले. Saurabh katara Latest News गंभीर जखमी झालेल्या सौरभ यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यासोबत त्रिवेंद्रमचा आणखी एक जवान शहीद झाला.
शहीद सौरभ यांचे वडील नरेश कटारा हेदेखील आर्मीमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत्त झालेत.

माहिती share करायला विसरू नका

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *