Sharad Pawar Latest News महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार हे एक महत्वाचे नेते आहेत.त्यांच्या पुढाकारानेच महाराष्ट्रात निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले सर्व पक्ष निवडणुकीनंतर पक्ष एकत्र आले व भाजपची महाराष्ट्रातून सत्ता गेली तसेच आणखी काही राज्यातूनही भाजपची सत्ता गेली असली तरी त्यांची जादू अजुनही कायम आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणलं. त्या प्रयोगाची देशभर चर्चा झाली. Sharad Pawar Latest News देशपातळीवर सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपची घोडदौड रोखू शकतो अशी भावना व्यक्त केली गेली मात्र त्या प्रमाणं प्रयत्न होताना दिसत नाहीत.
यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशात पर्याय पाहिजे परंतु तसा मजबूत पर्याय उभा करण्यात विरोधी पक्षांना अपयश आलं असंही त्यांनी कबूल केलं. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय.
शरद पवार म्हणाले, लोकांना आज पर्याय हवा आहे.मात्र जोपर्यंत मजबूत पर्याय उभा केला जात नाही तोपर्यत बदल घडणार नाही. मोदींपेक्षा जोपर्यंत मजबूत पर्याय मिळणार नाही व काहीतरी करून दाखवणारा आहे हे जोपर्यंत ठळकपणे दिसत नाही तोपर्यंत लोक तो पर्याय स्वीकारणार नाहीत म्हणजेच नरेंद्र मोदींना शिवाय दुसरा विचार करणार नाहीत.
हॉटेल मध्ये भेटणाऱ्या जोडप्यासाठी एक महत्त्वाची बातमी
असा पर्याय उभा करण्यात विरोधकांना यश आलं नाही असंही ते म्हणाले. असा पर्याय निर्माण केला तर त्याला पाठिंबा मिळतो हे मी अनुभवलं आहे असंही ते म्हणाले.त्यांनी उदाहरण देत सांगितले कि उत्तर प्रदेशातही समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे लोकसभा निवडणुकीत एकत्र आले होते मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. Sharad Pawar Latest News भाजप विरोधाच्या कितीही घोषणा केली तरी हे पक्ष एकत्र येणं शक्य नाही अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे पवारांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय.
त्यामुळे जर नरेंद्र मोदीला पर्याय हवा असल्यास त्याच पद्धतीचा सक्षम मजबूत पर्याय मिळाल्यास बदल जरूर घडू शकतो तसा लोकांना पर्याय देखील हवा आहे.जर असा पर्याय मिळाला तर बदल नक्कीच पाहायला मिळेल.
माहिती share करायला विसरू नका