Shevanta Photos कोणतीही अभिनेत्री जेंव्हा झी मराठीच्या एखाद्या मालिकेत झळकते त्यानंतर त्या अभिनेत्रींना प्रसिद्धी मिळणे साहजिकच आहे. झी मराठी वरील रात्रीस खेळ चाले-२ या मालिकेतील शेवंता या अभिनेत्री बद्दल पण असेच काहीतरी घडले आहे. Shevanta marriage photos शेवंता चे खरे नाव अपूर्वा नेमळेकर आहे. रात्रीस खेळ चाले भाग 1 प्रमाणेच भाग 2 पण प्रेक्षकांना खूप आवडू लागला आहे. शेवंता आणि अण्णा यांच्यामुळे मालिका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचली आहे.
अपूर्वा ने तिचे शिक्षण डी जी रुपारेल या कॉलेज मधून पूर्ण केले. तीने यापूर्वी झी मराठीवरील “आभास हा” व स्टार प्रवाह वरील “आराधना” या मालिकेतही अभिनय केले आहे. तसेच तिने “एका पेक्षा एक” या शो मध्ये पण सहभाग नोंदविला होता. 2014 आलेल्या कलर्स मराठी वरील “तू माझा सांगाती” मालिकेत अपूर्वा ने सोयराबाई ची भूमिका उत्तम रित्या साकारली होती. तसेच अपूर्वा ने “चोरीचा मामला”, आलाय मोठा शहाणा या नाटकात पण अभिनय केला आहे. तिला प्रेक्षकांनी ज्वेलरी ब्रँड च्या जाहिरातीमध्ये पण पाहिले आहे. स्वतः अपूर्वा ने देखील स्वतःचे अपूर्वा कलेक्शन नावाचे ज्वेलरी शॉप सुरू केले आहे. तिचे हे शॉप दादर मधील निर्मल नर्सिंग होम जवळ असून तिथे अनेक मराठी अभिनेत्री आलेल्या पाहायला मिळतात.
खूप कमी प्रेक्षकांना ही गोष्ट माहिती असेल की अपूर्वाचा विवाह झाला होता. तिचे लग्न 18 डिसेंबर 2014 रोजी रोहन देशपांडे यांच्याशी झाले होते. रोहन हे राजकारणात सक्रिय असून ते शिवसेनेच्या युवा सेने मध्ये पदाधिकारी म्हणून कार्य करतात. युवा सेनेच्या तसेच शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला रोहन उपस्थिती लावताना दिसतात. अपूर्वाने तिच्या इंस्टाग्राम बायो मध्ये तर “हॅपीली सिंगल” असे टाकले आहे.
त्यामुळे या विवाहाचे पुढे काय झाले, हे आणखीन उघड झाले नाही. असो अपूर्वा च्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन अप्सरा मिळाली असेच म्हणता येईल. अपूर्वाला तिच्या भावी आयुष्यासाठी आणि करीयर साठी खूप साऱ्या शुभेच्छा.
‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा,
माहिती share करायला विसरू नका