Surabhi hande latest झी मराठी वरील आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय मलिकेपैकी एक म्हणजेच “जय मल्हार” ही मालिका होय. 18 मे 2014 रोजी सुरू झालेल्या या मालिकेचे निर्माते सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे हे होते. मालिकेत खंडोबाची भूमिका देवदत्त नागे, म्हाळसा ची भूमिका सुरभी हांडे व बानूची भूमिका ईशा केसकर हीने केली होती. Surabhi hande latest म्हाळसाची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडे बद्दल थोड जाणून घेऊयात.
20 मे 1991 ला सुरभी चा जन्म जळगाव येथे झाला. ती लहानाची मोठी जळगाव येथेच झाली. तीने तीचे बारावी पर्यंतचे शिक्षण जळगाव येथेच पूर्ण केले. नंतर तिने नागपूर येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. वयाच्या 16 व्या वर्षीच सुरभी ने स्वामी या नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.
रात्रीस खेळ चाले 2 मधील शेवंताच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटोज् पाहा..
तिच्या अभिनय क्षेत्राला खरे यश “जय मल्हार” मालिकेमुळे मिळाले. या लोकप्रिय मालिकेतील तिच्या म्हाळसेच्या भूमिकेला लोकांनी खूपच पसंती दिली. सुरभी ने त्याच दरम्यान “अग्ग बाई अरेच्चा 2” या चित्रपटात देखील काम केले. नंतर लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतून देखील सुरभी प्रेक्षकांना दिसली.
गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट 2018 मध्ये सुरभी चा दुर्गेश कुलकर्णी सोबत साखरपुडा झाला होता. दुर्गेश हा सुरभी चा अगोदर पासून मित्र होता. याच मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी फेब्रवारी 2019 मध्ये लग्नाची गाठ बांधली. Surabhi hande latest दोघांच्या फोटोज् सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. सुरभी व दुर्गेश या दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा..