tejasha patel latest news update

पुण्यातील सिंहगड येथील गरोड परिसरात माणिकबाग इथे घरातच एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली होती. या तरूणीचा संशयित मृत्यू झाला होता.याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता सिंहगड पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे..

ही घटना सोमवारी दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ताब्यात घेतलेले तिघे जण हे मृत तरुणीचे मित्र असल्याची माहिती आहे. मात्र हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.घटना उघडकीस आली तेव्हा तेजसाच्या घरात दारूच्या बाटल्या तसेच हुक्का पात्र आढळून आले. घटना घडली त्या रात्री तिने मित्रांसोबत पार्टी केली हिती.

दरम्यान,  मृत तरुणी पंचशील नगर, पालवन रोड,  बीड येथील मूळची राहणारी आहे. तिचे शिक्षण एम.बी.ए झालं असून नोकरीच्या शोधासाठी इथे भाड्याने फ्लॅट घेऊन आई आणि दोन बहिणी समवेत वास्तव्यास होती. काही

दिवसांपूर्वी हे सर्वजन बीड इथे गेले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती. तिच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे.सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबागेत 26 वर्षीय उच्चशिक्षीत मुलीचा राहत्या घरात मृतदेह मिळाला. Tejasa payal latest News घरात बेडवर तरुणीचा मृतदेह होता. तर घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. घरात तीन ते चार दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे या प्रकरणात मृत तरुणीच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी याआधीच स्पष्ट केलं होतं.

तरुणांची बदलती जीवनशैली, फसव्या ग्लॅमरच आकर्षण यातून तेजसाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.तरुणांची बदलती जीवनशैली, फसव्या ग्लॅमरच आकर्षण यातून तेजसाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.

परत निर्भया हत्याकांड.. मुलीचा बलात्कार करून जिवंत जाळले.

दरम्यान, या प्रकरणात मृत तरुणीच्या कुटुंबीयांची आणि तिच्या जवळच्या लोकांची चौकशी करण्यात येणार असून तिचे कॉल रेकॉर्डही पोलिसांनी मागवले आहेत.तेजसाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी तिची हत्या झाली हे निष्पन्न झाले आहे कारण हे तीनही आरोपी तेथे हजर होते हे तपासात स्पष्ट झाले आहे व त्यांनी हुक्का कोठून आणला याबाबत हि चौकशी होणार आहे व घटना स्थळी कोणाचाही मोबाईल आढळून आला नाही यामुळे हे कृत्य पुरावे नष्ट करण्याचे असू शकते आणि विशेष म्हणजे या घराला बाहेरून कुलूप लावाले होते. व तपासामध्ये तिघांच्या हि बोलण्यात विभिन्नता आणि आणखी कोणी मित्र या प्रकरणात आहेत का याबाबत पोलिसांना साशंकता आहे. न्यायालयाने तिघांना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी तसेच संबंधितांची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *