Tula pahate re तुला पाहते रे मालिका संपून खूप महिने उलटले असले तरी या मालिकेची प्रेक्षकांची मनातील जागा आणखीन कमी झालेली नाही. ही मालिका जरी जास्त वेळ नाही चालू शकली तरी मालिकेला प्रेक्षकांनी खूपच पसंद केले होते. म्हणूनच मालिकेने टीआरपी मध्ये उच्चांक गाठून नवीन रेकॉर्ड केला होता. या मालिकेत सुबोध भावे असल्याने तर मालिकेला प्रेक्षकांनी पसंद करणे साहजिकच होते. परंतू अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या गायत्री दातार ला पण लोकांनी तितकीच प्रसिद्धी दिली.
तुला पाहते रे मालिकेतील ईशा म्हणजेच गायत्री दातार आता वेगळ्याच रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी झी युवा वरील डान्सिंग क्वीन या डान्स शो मधून गायत्रीने टेलिव्हिजन वर पुनरागमन केले होते. Tula pahate re isha त्यामुळे तिच्या फॅन्स साठी ती एक मेजवानीच आहे. आता परत गायत्री काहीतरी नवीन घेऊन येत आहे. तुला पाहते रे मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड व AME म्युझिक कंपनी हे एक नवीन अल्बम घेऊन येत आहेत. अल्बमचे नाव “सये” असून ते एक रोमँटिक गाणे असेल. या अल्बम गीतात गायत्री दातार दिसणार आहे. या गाण्याला सुप्रसिद्ध मराठी गीतकार स्वप्नील बांदोडकर यांनी गायले असून शशांक प्रतापवार यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच हे गीत साहस साखरे यांनी लिहिले आहे.
“सये” गीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणार असून गायत्री सोबत या गाण्यात रियाज मुलानी दिसणार आहे.Tula pahate re Gayatri DAtar latest या गीताची सर्व फॅन्स ना उत्सुकता असून असून लवकरच हे गीत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितले आहे.
माहिती share करायला विसरू नका