ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस Vikas sabnis Cartoonist तब्बल ५० वर्षे व्यगंचित्रकलेची अव्याहतपणे सेवा करणारे व राजकीय व्यंग अचूकपणे हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे यांचे आज रात्री दहाच्या सुमारास मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.विकास सबनीस गेला आठवडाभर रुग्णालयात उपचार घेत होते.
अधिक तपासणीसाठी त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. सबनीस यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
विकास सबनीस यांच्यावर आर. के. लक्ष्मण आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव होता. त्यांचे व्यंगचित्र पाहून सबनीस यांनी १९६८ पासून राजकीय व्यंगचित्र काढण्याची सुरुवात केली होती त्यांच्या कारकीर्दीस ५० वर्ष पूर्ण झाले होते. त्यानिमित्त २० फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात आयोजित ‘रेषा विकासची, भाषा ५० वर्षांची’ या विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
Credit: Facebook.com
त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राचं मोठं नुकसान झाले आहे. त्यासोबतच अनेक कलाकारांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.सबनीस यांच्या पार्थिवावर शनिवारी 28 डिसेंबर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. Vikas sabnis Cartoonist News तसेच राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.त्यांनी काढलेली काही विशेष व्यंगचित्रे……
Credit: Facebook.com
माहिती share करायला विसरू नका