Yogita Gawali Gawali महाराष्ट्रातील कुविख्यात गँगस्टर अरुण गवळी हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. याच अरुण गवळीच्या मुलीचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. योगिता गवळी असे अरुण गवळीच्या मुलीचे नाव आहे. Yogita Gawali Engagement News योगिताचा साखरपुडा मराठी अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत झाला आहे. पुण्यातील एका हॉटेल मध्ये अगदी खाजगी पद्धतीने दोघांचा साखरपुडा झाला असून या कार्यक्रमाला जवळचे नातेवाईक आणि काही मित्रपरिवार उपस्थित होते.
अक्षय वाघमारे याने मराठी मालिका व चित्रपटात पण काम केले आहे. फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच, अक्षयने ती फुलराणी, गुलमोहर या मालिकेमध्ये पण काम केले आहे. योगिता व अक्षय हे गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. शेवटी दोघांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या साखरपुड्याला मुग्धा परांजपे, क्षितीज दाते, हृषिकेश देशपांडे व विभावरी देशपांडे या कलाकारांची हजेरी होती. दोघांचा विवाह फेब्रुवारी 2020 मध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे.
अनेक मर्डर केस मध्ये गुन्हेगार असलेल्या अरुण गवळी यांच्या मुलीचा विवाह असल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे. नाशिक तुरुंगात कैद असल्याने अरुण गवळी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. Yogita Gawali Husband name अरुण गवळी यांची आजही सर्वत्र तितकीच दहशत आहे. त्यांच्यावर काही चित्रपट पण काढण्यात आले आहेत. त्यात दगडी चाळ हा मराठी चित्रपट व डॅडी हा हिंदी चित्रपट यांचा समावेश आहे.
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील माधुरी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच मॉडर्न
माहिती share करायला विसरू नका