बघता बघता 2019 हे वर्ष संपून गेलं. झी मराठी वरील प्रेक्षकांसाठी हे वर्ष एक मेजवानीच होती. Zee Marathi top Moment 2019 या वर्षी झी मराठी वाहिनीवर काही अविस्मणीय क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्यातील टॉप 5 क्षण आपण पाहुयात..
5. राधिका ने सौमित्र शी लग्नांने मालिकेला मिळाली कलाटणी
मागील 3 वर्षापासून चालणारी मालिका “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील बरेच चढ उतार पाहायला मिळाले. गुरुनाथ ने राधिका वर पैसे पळविल्याचा आरोप लावला व नंतर राधिका ची त्यातून सुटका झाली. राधिका चा मित्र सौमित्र ने राधिकाला लग्न करण्यासाठी मागणी केली. बराच विचार केल्यानंतर राधिकाने ते मान्य करून शेवटी सौमित्र शी लग्न केले. या लग्नामुळे फॅन्स नी मालिकेचे नाव बदलून “माझ्या बायकोचा नवरा” करण्याचे आव्हान केले.
4. राणाच्या हत्तेचा प्रयत्न व नंतर त्याचे पुनरागमन
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील मुख्य कलाकार राणा याची मालिकेत हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात अाला. हा कट नंदिता व पप्या यांनी केला होता. राणा मेला अशी चर्चा असतानाच तो जिवंत असल्याचे दाखविण्यात आले व त्याने राजा राजगोंडा या रुपात पुनरागमन केले व सर्वांचा बदला घेतला.
3. रात्रीस खेळ चाले मालिकेचे पुनरागमन
अगोदरच झी मराठी वर Zee Marathi top Moment 2019 गाजलेल्या रात्रीस खेळ चाले मालिकेचा दुसरा भाग वर्षाच्या सुरुवातीला सुरू झाला. पहिल्या भागाच्या प्रेमाला पाहूनच दुसरा भाग सुरू करण्यात आला. रात्रीस खेळ चाले 2 या भयावह मालिकेला अण्णा नाईक आणि शेवंता यांनी प्रसिध्दी दिली.
रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दत्ताची खरी पत्नी आहे ही अभिनेत्री
2. विकिशा च्या लग्नाचा दिमाखदार सोहळा..
एका वर्षापेक्षा कमी कालावधीत संपणाऱ्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीतच अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले. या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घालून ठेवली होती. मालिकेतील मुख्य कलाकार विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांच्या अभूतपूर्व विवाह सोहळ्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यामुळेच हा क्षण झी मराठीच्या यावर्षातील टॉप 5 मोमेंट पैकी दुसऱ्या स्थानावर आहे.
1.अनाजी पंतला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले..
Zee Marathi top Moment 2019 झी मराठीच्या 2019 या सालातील टॉप पाच क्षणापैकी एक नंबर चे स्थान मिळविले आहे ते “स्वराज्य रक्षक संभाजी” या ऐतिहासिक मालिकेत अनाजी पंत व आणखीन दोषींना हत्तीच्या पायाखाली दिलेली शिक्षा. छत्रपती संभाजी महाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न त्या नीच लोकांनी केल्यामुळेच संभाजी महाराजांनी त्या सर्वांना हत्तीच्या पायाखाली दिले. हा क्षण महाराष्ट्रातील जनतेने आनंदाने पाहिला. त्यामुळेच या क्षणाला या यादीत पाहिले क्रमांक देण्यात आले आहे.
माहिती share करायला विसरू नका……………………………..