Adoption girl news मुलगी जन्माला आली म्हणून ओझं समजणाऱ्या मूर्ख माणसासाठी मुबई मधील घटना हि अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. मुबई मधील घाटकोपर मधील पंत नगर येथे राहनाऱ्या दाम्पत्याने स्वतः ला 14 वर्षाची मुलगी असताना देखील मुलगीच दत्तक म्हणून घेतली आहे.त्यांना या विषयी प्रेरणा उमंग या पुस्तक पासून मिळाली आहे.
स्वत:ची मुलगी असूनही पुन्हा मूल दत्तक घेताना मुलगीच घेण्याचा या दाम्पत्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. त्यांचा सकारात्मक विचार वाखाणण्याजोगा आहे. Adoption girl news इतकेच नव्हे तर बहुतांश पितृसत्ताक समजल्या जाणाऱ्या आपल्या समाजात हा दृष्टिकोन व विचार रुजणे गरजेचे आहे’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील घाटकोपरमधील एका दाम्पत्याची प्रशंसा केली.
त्या दाम्पत्याने ‘सेंट कॅथरिन्स होम’शी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. Adoption girl news एखादे मूल अनाथ असेल किंवा जैविक माता-पित्यांनी त्याग करून त्याला अनाथालयात दिले असेल तर इच्छुक दाम्पत्याला दत्तक देण्यासंदर्भात संबंधित संस्थेला उच्च न्यायालयात दत्तक याचिका करावी लागते. त्याप्रमाणे ही याचिका न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणीस आली होती.त्यांनी दत्तक मुलीच्या नावे दीड लाख रुपयांचा एकरकमी एलआयसी विमा काढण्याचे निर्देशही न्यायमूर्तींनी त्यात या दाम्पत्याला दिले आहे.
लाडू बद्दलची ही माहिती वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल…
या घटने मुळे समाजात जे गर्भपात करतात किंवा जे मुलगाच हवा असा अट्टाहास असतो यांच्या साठी हि एक चपराक ठरणार आहे व समजात नवीन प्रेरणा मात्र नक्कीच मिळेल.त्या दाम्पत्यास व त्यामुलीस त्यांच्या भावी आयुष्य साठी Mardmarathi.com कडून शुभेच्छा…….