Australia fire news

 

Australia fire news ऑस्ट्रेलियातील वणवा गेल्या अनेक दिवसा पासून सुरु आहे . या वणव्यात माणसांचा तर जीव घेतलाच पण त्याहीपेक्षा जास्त प्राण्यांचा जीव घेतला आहे. या आगीमध्ये कोट्यावधी  प्राणी या आगीत मरण पावले आहेत .  परंतु या दुर्घटना मध्ये  एक चांगली गोष्ट म्हणजे असंख्य प्राण्यांना वाचवण्याचे कार्य येथील  लोक आपल्या जीवाची बाजी लावून करत आहेत . यामधील च ऑस्ट्रेलिया तील एक परिवार असा आहे जो ९०००० पेक्षा जास्त प्राण्यांना या आगीपासून वाचवले आहेत्त व त्यांची सेवा सुश्रुषा ते स्वतः करतात .

ऑस्ट्रेलियाचे वन्यजीव जाणकार आणि प्राणिसंग्रहालयाचे मुख्य स्टीव्ह आयर्विन या वाइल्डलाइफ तज्ञाच्या कुटुंबाने नुकतंच ९०,००० वा प्राणी ऑस्ट्रेलियाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल  झाल्याचं सांगितलं आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे हे सगळे प्राणी या एकट्या कुटुंबाने वाचवले आहेत.स्टीव्ह आयर्विन हे त्यांना ‘दि क्रोकोडाइल हंटर’ नाव मिळालं होतं.कारण त्यांचा मुख्य अभ्यास हा मगर होता.व ते त्यावर अभ्यास करत असत. २००६ साली विषारी स्टिंगरे माशामुळे त्यांचा जीव गेला. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या प्राणीप्रेमाची परंपरा त्यांच्या कुटुंबाने चालवली. Australia fire news तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी अनेक प्राण्यांना वाचवलं. सध्याच्या आणीबाणीच्या काळात देखील ते दिवसरात्र काम करत आहेत. नुकतंच त्यांनी प्लॅटिपस प्राण्याला वाचवलं. हा त्यांनी वाचवलेला ९०,००० वा प्राणी होता.

Australia fire news आयर्विन कुटुंबाकडून झु हॉस्पिटल चालवलं जातं. गेल्या १६ वर्षांपासून या हॉस्पिटलने आठवड्याचे ७ दिवस आणि दिवसाचे २४ तास प्राण्यांना सेवा पुरवत आहेत. माणसांवर ज्या काळजीने उपचार केले जातात त्याच प्रकारे प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. स्टीव्ह आयर्विन यांचा मुलगा रोबर्ट आयर्विनने म्हटलं आहे की ‘आज प्राण्यांना आपली सर्वात जास्त गरज आहे.’ स्वतःचं आयुष्य वाहून घेऊन एवढी वर्ष प्राण्यांची सेवा करणे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या झु हॉस्पिटल द्वारे सेवा सुश्रुषा हि अविरत चालू आहे.

त्यांच्या या कार्यास mardmarathi.com च्या शुभेच्चा

 

माहिती आवडल्यास share नक्की करा .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *