झी मराठी वर मागील काही वर्ष चाललेल्या लागिर झालं जी या मालिकेत मालिकेचा नायक अजिंक्य शिंदे यांच्या मामीचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्री बद्दल आज आपण बोलुयात. lagir zal ji serial news मालिकेच्या सुरुवातीला मामी नावाचे पात्र विद्या सावळे यांनी साकारले होते. त्यांनी 1 वर्ष उत्तमरित्या अभिनय केला होता. नंतर त्यांचे निर्मात्या सोबत काहीतरी वाद झाल्याने त्यांनी मालिकेतून माघार घेतली होती. पण त्यांचा अभिनय व मामी हे पात्र प्रेक्षकांनी खूपच पसंत केले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी राहणाऱ्या विद्या सावळे यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1977 साली झाला होता. महाविद्यालयात असताना पासूनच 1996 पासून त्यांनी अनेक नाटक व एकांकिका स्पर्धेत सहभाग घेतला होता. खरे तर अध्यापिका पण होत्या. lagir zal ji serial news अनेक कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालन पण केले आहे. तसेच सुपर्ब प्लॅन, जुगाड या मराठी चित्रपटात पण त्यांनी काम केले आहे.
“लागिर झालं जी” मालिकेतून अचानक बाहेर पडलेल्या मामी नंतर काय करीत आहेत हे प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा होती. काही महिन्याच्या विश्रांती नंतर विद्या सावळे यांनी कलर्स मराठी या वाहिनीवरील “जीव झाला येडा पीसा” या मालिकेत काम करायला सुरुवात केली. या मालिकेत त्यांनी शिवाची आई मंगलची भूमिका निभावली आहे. विद्या जी जसे त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात, तसेच त्या आता त्यांच्या मॉडर्न फोटोग्राफी मुळे पण चर्चेत आहेत. नेहमी साडीत दिसणाऱ्या विद्या सावळे यांचा मॉडर्न अवतार पाहून त्या एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रीला मागे टाकणार असेच वाटत आहे. विद्याजीना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
lagir zal ji serial news
मागील दशकातील झी मराठीच्या टॉप 5 सीरिअल्स..ही मालिका ठरली 1 नंबर
माहिती आवडली तर नक्की शेयर करा