गेल्या २-३ दिवसापासून सोशल मीडिया वर चक्क चित्रपटाचा ट्रेलर चोरीला गेला अशी बातमी पसरली होती. बातमी व्हायरल होणे साहजिकच होते, कारण कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर हरवणे अशी घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शन केलेला आगामी चित्रपट “चोरीचा मामला” या चित्रपटाच्या ट्रेलर बाबतीत असे काहीतरी घडल्याची चर्चा होत होती.
19 जानेवारी ला “चोरीचा मामला” या आगामी मराठी विनोदी चित्रपटाचे ट्रेलर चे प्रदर्शन होणार होते. पण त्या दिवशी सकाळपासूनच प्रियदर्शन जाधव व त्यांची टीम सोशल मीडियावरून लाईव्ह येऊन हेच सांगू लागली होती की “त्यांचा ट्रेलर हरवला असून, कोणाला सापडला तर आम्हाला कळवा.” त्या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव असे अनेक मराठी दिग्गज कलाकार आहेत. ट्रेलर अशा पद्धतीने कसा चोरीला जाऊ शकतो असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.
मग त्याच दिवशी उलगडा करण्यात आला की ट्रेलर चोरीला वैगेरे गेला नव्हता. चित्रपटाच्या कथानकाप्रमाने ट्रेलर हरवल्याची अफवा पसरवण्यात आली होती. चित्रपटात एका कुत्र्याच्या चोरीमुळे होणारी गुंतागुंती व त्यामुळे उडालेली धमाल या चित्रपटातून दिसून येणार आहे.
त्यामुळे ट्रेलर चोरीला वैगेरे गेला नाही व चित्रपटाचा ट्रेलर युट्यूब वर पदर्शित करण्यात आला आहे. “चोरीचा मामला” या चित्रपटात अनेक विनोदी अभिनेते असल्याने हा चित्रपट खूपच धमाल असल्याचे ट्रेलर वरून दिसून येत आहे. हा चित्रपटात येत्या 31 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.