मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर व सोज्वळ अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या आयुष्याबद्दल आज जाणून घेऊयात. वडोदरा, गुजरात येथे प्रार्थना बेहेरे हीचा जन्म झाला. अत्यंत आकर्षक घारुळे डोळे असणाऱ्या या अभिनेत्रीने सुरुवातीला झी टीव्ही या हिंदी वाहिनीवरील गाजलेल्या “पवित्र रिश्ता” या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. या मालिकेत तीने वैशाली जयपूर वाला हा रोल केला होता. तीचा अभिनय पाहून नंतर तिला अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.
“लव्ह यू मिस्टर कलाकार” या हिंदी चित्रपटात काम्या नावाचे पात्र उत्तमरित्या केले होते. Prarthana behare latest तसेच, सलमान खानच्या “बॉडीगार्ड” या चित्रपटात पण एक छोटासा रोल केला होता. प्रार्थना बेहरे ने नंतर “कॉफी आणि बरेच काही”, “मिथवा”, “माय लेक”, “मिस्टर अँड मिसेस सदाचारी”, “ती आणि ती”, “फुगे”, अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात काम केले आहे.
प्रार्थना बेहरे तिच्या अजब गजब हसण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मध्ये आल्यास पण तिची तिच्या हसण्यावरून खिल्ली उडवली जाते.
2 वर्षांपूर्वी प्रार्थना ने निर्माता, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्याशी विवाह केला. 14 नोव्हेंबर 2017 रोजी प्रार्थना आणि अभिषेक यांचा विवाह गोवा येथे संपन्न झाला होता. दोघांच्या विवाहाला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. Prarthana behare latest त्यात वैभव तत्ववादी, सोनाली कुलकर्णी यांचा देखील समावेश होता. दोघांचा विवाह अत्यंत पारंपरिक पद्धतीने झाला होता. दोघांनीही त्यांच्या लग्नाची तारीख स्वतःच्या बोटावर गोंदवून घेतले आहे. दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
लाडू बद्दलची ही माहिती वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल…
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.