गेल्या वर्षीपासून तुझ्यात जीव रंगला मालिकेत एक महत्त्वाचे पात्र होवून गेलेल्या लाडू बद्दल आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात. सध्या लाडू चे मालिकेतील पात्र दिसत नसले तरी लाडू खऱ्या आयुष्यात खूप पराक्रम करीत आहे. मालिकेत जसा लाडू ला कुस्तीचे गुण अवगत असल्याचे दाखविण्यात आले आहे तसाच लाडू त्याच्या खऱ्या आयुष्यात पण आहे. म्हणजेच लाडू खऱ्या आयुष्यात पण कुस्तीचे धडे घेत असतो.
लाडू चे खरे नाव राजवीरसिंह रणजित गायकवाड असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर मधील “लिट्ल वंडर स्कूल” मध्ये लाडू शिक्षण घेत आहे. तसेच तो कुस्ती मोतीबाग तालीम येथे घेत असतो. याच तालीमीच्या जोरावर राजवीर ने कुराश या जिल्हास्तरीय स्पर्धेत राजवीर ने चार वेळा सुवर्णपदक मिळविले आहे. याचा व्हिडिओ देखील त्याने त्याच्या इंस्टाग्राम वर पोस्ट केला होता.
राजवीर चे वडील रणजित गायकवाड पण मोठे प्रसिद्ध व्यक्ती आहेत. रणजित हे वेट लिफ्टिंग या ताकदीच्या खेळात चॅम्पियन मानले जातात. या खेळात त्यांनी अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे व अनेक पारितोषके मिळविली आहेत. त्यात गोल्ड मेडल्स पण खूप मिळविले आहेत. तसेच त्यांना भारतीय सेनेने पण नौकरी करण्याचे भाग्य मिळाले. राजवीर ची आई या बँकेत जॉब केला आहे.
पण लाडूच्या भविष्यासाठी त्यांनी कोल्हापुरात राहण्याचे ठरविले. लाडूचे आजोबा विठ्ठल गायकवाड पण पण नामवंत कुस्ती पेहलवान होते. म्हणजेच पिढ्या नी पिढ्या चालत आलेली ही परंपरा राजवीर जपत आहे, असेच म्हणावे लागेल. अभिनय तसेच कुस्तीमधील लाडू चे हे पराक्रम पाहता लाडू चे भविष्य छानच असणार असेच दिसत आहे. राजवीर ला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली तर नक्की शेयर करा
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका