झी मराठी zee marathi top 5 serials list ही वाहिनी नेहमीच मालिकेच्या माध्यमातून काही तरी नवीन घेऊन येत असते. गेल्या दशकभरातील (२०१०-२०१९) प्रेक्षकांना आवडलेल्या झी मराठीवरील टॉप 5 मालिका कोणत्या होत्या ते पाहुयात. ( छ्त्रपती संभाजी महाराज यांचा जनमानसात सन्मान असल्यामुळे त्यांना बाकीच्या मालिके सोबत तुलना करणे चुकीचे ठरेल. म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला या यादीत घेण्यात आले नाही.
५. जुळून येती रेशीमगाठी – झी मराठीवर 25 नोव्हेंबर 2013 रोजी जुळून येती रेशीमगाठी ही मालिका सुरू झाली. हेमंत देवधर दिग्दर्शित या मालिकेत ललित प्रभाकर याने अदित्य ची व प्राजक्ता माळी हीने मेघना ची भूमिका निभावली होती. या दोघांच्या गोड प्रेम नात्याला प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिले.
4. काहे दिया परदेस : 2 वेगळ्या राज्यातील मुलगा आणि मुलीला नकळत होणारे प्रेम व त्या प्रेमाचे नंतर लग्नात होणारे रूपांतर हे या मालिकेतून दाखविण्यात आले. शिव ची भूमिका ऋषी सक्सेना याने तर गौरीची भूमिका सायली संजीव हीने केली होती. प्रेमातील वेगळेपण व हिंदी भाषेचा वापर असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी दाद दिली.
3. लागीर झालं जी : ग्रामीण भागातील दृश्य दाखवीत सुरू झालेल्या या मालिकेला अख्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. अजिंक्य शिंदे (नितीश चव्हाण) चे देशाप्रती असलेले प्रेम व यामुळेच शितली (शिवानी बावकर) अज्याच्या प्रेमात कशी पडली हे मालिकेत दाखविण्यात आले. दोघांचे नंतर लग्न होते व फौजीचे जीवन कसे चालत असते हे उत्तमरित्या या मालिकेत दाखविण्यात आले.
2. होणार सून मी ह्या घरची : झी मराठी काहीतरी वेगळं घेऊन येत असते याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ही मालिका होय. 15 जुलै 2013 ला आलेली या मालिकेत श्री (शशांक केतकर) याला 5 आई व एक आज्जी दाखविण्यात आल्या, ज्यांचा संसार जास्त टिकू शकला नव्हता. zee marathi top 5 serials list नंतर श्री आणि जान्हवी(तेजश्री प्रधान) या दोघांनी प्रेम करून छान संसार केलेलं या मालिकेतून दाखविण्यात आले. जान्हवी चा “काहीही हा श्री” हा डायलॉग खूपच व्हायरल झाला होता.
१. जय मल्हार : गेल्या दशकातील टॉप ५ मालिकेमध्ये एक नंबरचे स्थान जय मल्हार या मालिकेने मिळविले आहे. महेश कोठारे निर्मित श्रद्धास्थान खंडोबा यांची महिमा उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली. zee marathi top 5 serials list मालिकेत खंडोबाची भूमिका देवदत्त नागे,म्हाळसा देवीची भूमिका सुरभी हांडे तर बानाई ची भूमिका ईशा केसकर यांनी खूपच सुंदररित्या निभावली होती. घरघरातून या मालिकेला प्रेक्षकांनी पसंद केले होते.
२०१९ मधील झी मराठी चे टॉप 5 क्षण.. एक नंबरचा क्षण सर्वांना आवडला
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.