सध्या सगळीकडे कोरोना या जीवघेण्या व्हायरस ने संपूर्ण जगात हाहाकार माजविला आहे. जगातील प्रत्येक नागरिक या व्हायरस मुळे घाबरून गेला आहे. अशा परिस्थितीत जर कोणी व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यातून किंव्हा दुसऱ्या राज्यातून, तसेच दुसऱ्या देशातून अाला असेल तर लोक त्यांच्याकडे भीतीच्या नजरेने पाहत आहेत. अमुक तमुक व्यक्तीने येताना सोबत कोरोना व्हायरस तर घेऊन अाला नसेल अशी लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. झी मराठी वरील “तुला पाहते रे” मालिकेतून प्रकाशझोतात आलेली माहिरा म्हणजेच अभिज्ञा भावे नी कोरोना संदर्भात तीच्या आयुष्यात घडलेला किस्सा शेयर केला आहे.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिज्ञा तिच्या आजी आणि आई सोबत मुंबई येथे वास्तव्यास होती. काही महिन्यांपूर्वी तिची आई तिच्या वडिलांकडे दुबई कडे गेली. 18 मार्च रोजी तिची आई विमानाने आली. विमानतळावर आल्यानंतर तिच्या आईंचा व्यवस्थित चेक अप करण्यात अाला. कोरोना संदर्भातील प्रत्येक गोष्टीची विचारपूस करण्यात आली. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात अाला व त्यांना सांगण्यात आले की पुढील 15 दिवस तुम्ही स्वतःला घरामध्ये कैद करून एकटेच रहा. परदेशातून आल्यामुळे कोरोनाचा धोका असू शकतो, या कारणाने त्यांना असे सांगण्यात आले व त्याप्रमाणेच अभिज्ञा आज्जी सोबत दुसरीकडे राहायला गेले व स्वतःच्या घरी आईला ठेवले.
ज्यावेळी अभिज्ञा ची आई दुबई वरून वापीस आली तेंव्हा पासून तीला सर्वांकडून विचारपूस करण्यात आली. “तू ठीक आहेस का?, तुझी आई दुबई वरून आली, त्यांना कोरोना तरी नाही ना? “तू स्वतःची काळजी घे”. या सर्व प्रश्नांचा माहिराला खूप संताप अाला. त्यामुळेच तीने सोशल मिडीयाचा वापर करून आपल्याला या सर्वाचा किती त्रास होत आहे हे सांगितले.
तिने असे सांगितले की, एखादी व्यक्ती जर बाहेरून आली असेल आणि तीला जर शासनाने 15 दिवसासाठी स्वतःला घरामध्ये एकटे कैद (Isolate) करायला सांगितले असेल तर याचा अर्थ असा नसतो की त्या व्यक्तीला कोरोना झाला आहे. स्वतःला Isolate करणे आणि कोरोना positive असणे यात खूप फरक असतो. सर्वांना अभिज्ञाने विनंती केली आहे की, लोकांनी अशा व्यक्तींची काळजी घ्या, दूर राहून अशा व्यक्तींची विचारपूस करा की त्यांना काय हवे काय नाही, अशा लोकांना धीर देत रहा.पहा व्हिडीओ …