corona virus symptoms भारतात लॉक डाऊन होवून आठवडा होवून गेला आहे. त्यामुळे येणारी काही दिवस धोक्याची असू शकतात. आठडाभरापासून कोणीही बाहेर पडले नाही, त्यात कोरोना ची लागण झाली आहे की नाही हे समजायला 12-15 दिवस लागत असतात. त्यामुळे येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाची प्राथमिक कोण कोणती लक्षणे असू शकतात ते पाहुयात.
1. कोरोना होण्याचे पहिले लक्षण हे एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला येणे.
2. काही डॉक्टरांनी असे सांगितले आहे की कोरोना मुळे शरीराचे तापमान उच्चतम पातळीला जाऊन पोहोचते. त्यामुळे जास्त ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3. कोरोनाच्या रुग्णांना श्वसन प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. श्वास घेण्यास अडथळा होत असतो. हे प्रमाण वृद्ध व्यक्तींमधे जास्त दिसून येत आहे.
4. रुग्णांना सांधेदुखीचा त्रास सुरू होत असतो.
5. स्नायूंच्या तसेच मास पेशी मध्ये वेदना सुरू होतात तसेच थकवा जाणवू लागतो.
6. खोकला येऊन येऊन घश्यात खूप त्रास होऊ लागतो. इतका त्रास होतो की नंतर त्या ठिकाणी सूज येत असते. corona virus symptoms
7. सर्दी हे देखील कोरोना चे लक्षण असून नाकातून सतत पाणी वाहू लागते.
8. या रोगाची लागण झालेल्या रुग्णांना कोणत्याही पदार्थाचा स्वाद कळणे बंद होते.
corona virus symptoms
यापैकी तुम्हाला कोणतेही लक्षण आढलले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. ही माहिती जास्तीत जास्त शेयर करा.