zee serial restart news

सध्या जगभरात कोरोना ची लाट पसरली असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या कारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊन ची घोषणा केली. त्यामुळे प्रत्येक वर्गातील, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना घरीच राहावे लागत आहे. लॉकडाऊन च्या या निर्णयाचा फटका चित्रपटसृष्टी तसेच सर्व टीव्ही मालिकांना झाला. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येणे टाळले पाहिजे म्हणून सरकारने सर्व मालिकांचे व चित्रपटांचे शूटिंग थांबवायला सांगितले. शूटिंग थांबविल्या मुळे मालिकांचे प्रसारण करणे शक्य नाही. या कारणामुळे सर्व मराठी मालिकेचे प्रसारण साधारणतः 30/31 मार्च पासून थांबविण्यात येणार आहे.

zee serial restart news

चालू मालिकांचे प्रसारण थांबविल्या मुळे सर्व झी मराठीच्या प्रेक्षकांकडून जुन्या लोकप्रिय मालिका परत चालू करण्याची विनंती करण्यात येऊ लागली आहे. त्यात जास्त करून लोकांनी “स्वराज्यरक्षक संभाजी” आणि “तुला पाहते रे” या मालिकांचे पून: प्रसारण करण्याची विनंत्या येऊ लागल्या.

zee serial restart news

प्रेक्षकांच्या विनंत्याचा मान ठेवीत झी मराठी ने “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका परत दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना छत्रपती संभाजी महराजांचा इतिहास परत पाहायला मिळणार आहे. ही मालिका 30 मार्च पासून रोज संध्याकाळी 4 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत दाखविण्यात येणार आहे. मालिकेचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहे. असे ऐकण्यात येत आहे की शरद पवार यांनी या मालिकेला परत सुरू करण्याची मागणी केली होती. तुला पाहते रे या मालिके बद्दल लवकरच घोषणा केली जाईल.

zee serial restart news

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *