महाराष्ट्रतील अनेक स्त्रियांचे भाऊजी म्हणून प्रसिद्ध असलेले आदेश बांदेकर यांच्या बद्दल जाणून घेऊयात. होम मिनिस्टर मालिकेमध्ये प्रत्येक जोड्यांना आदेश बांदेकर त्यांचे लग्न, त्यांचे प्रेम कसे सुरू झाले हे विचारीत असतात. आज आपण त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊयात.
aadesh bandekar lovestory
आदेश बांदेकर यांना अभिनय क्षेत्राची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. पत्नी सुचित्रा यांना पण पण अगोदरपासूनच अभिनयाची आवड होती. सुचित्रा यांनी इयत्ता नववी वर्गात असताना “रथचक्र” या मालिकेत काम करीत असताना आदेश यांनी सुचित्रा ना पाहिलं होतं काम करीत होत्या. त्याच मालिकेत आदेश यांनी एक छोटासा पात्र साकारला होता. त्यानंतर आदेश नेहमीच सुचित्रा चा पाठलाग करू लागले. “तू माझा पाटला का करतोय, मी तुला होकार देणार नाही”, असे सुचित्राने सरळ आदेशांना सांगितले. हे ऐकून पण आदेश यांनी पाठलाग करणे थांबविले नाही.
एका दिवशी आदेश यांनी सुचित्राला दादरमधील एका हॉटेलात बोलवले होते. सुचित्रा हॉटेलात जाण्यास तयार झाल्या व सोबत त्यांनी आपल्या एका मैत्रिणीला घेतले. पण तरीही त्यांच्या मनात भीती असल्याने त्या हॉटेलात गेल्याच नाहीत. आदेश यांनी वाट पाहून पाहून चक्क सुचित्रा चे घर गाठले. त्यावेळी सुचित्रा घरी आली नव्हती ती पण जेव्हा ती घरी आली त्यावेळी आदेश तिच्या आईसोबत चहा पीत बसले होते. सुचित्रा ची आई काही कामानिमित्त घराबाहेर जाण्यासाठी निघाल्या. त्यांच्यासोबत आदेश पण घराबाहेर पडला. परंतु काही वेळातच आदेश पर्यंत सुचित्रा च्या घरी वापीस आला आणि तिला रागवू लागला.
तुझ्याकडून आज मला एक तर होकार हवा किंवा नकार हवा. आज मी तुला महालक्ष्मी च्या मंदिरात घेऊन जाणार होतो. हे ऐकून सुचित्रा आणि म्हटले, “कधी जायचं आपण महालक्ष्मीच्या मंदिरात”. हे ऐकताच सुचित्रा यांनी म्हटले, “कधी जायचं आपण महालक्ष्मीच्या मंदिरात.” हे ऐकून आदेश बांदेकर यांनी त्याच वेळी सुचित्राला प्रपोज केले.
दोघांचे प्रेम सुरू झाले खरे पण सुचित्रा च्या घरून यांच्या लग्नाला विरोध असल्याने दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. दोघांचे प्रेम सुरू झाले. दोघांनी 14 नोव्हेंबर 1990 रोजी बांद्रा कोर्टात लग्न केले. त्यांचे हे लग्न फक्त पन्नास रुपयांमध्ये झाले होते. आदेश आणि सुचित्रा यांच्या लग्नाला 29 वर्षे पूर्ण झाली असून त्यांना सोहम नावाचा एक मुलगा देखील आहे.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका