Anjalibai birthday सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने देशभरात सर्वच सेवा बंद आहेत. अशातच सर्वच चित्रपटांचे व मालिकांचे चित्रीकरण देखील थांबविण्यात आले आहे. यामुळे अनेक कलाकार आपापला वाढदिवस घरीच साजरा करताना दिसून येत आहेत.
Anjalibai birthday झी मराठीवरील प्रत्येक मालिकेतील कलाकारांचा जेंव्हा पण वाढदिवस असतो तेंव्हा ते मालिकेच्या सेटवरच आपला वाढदिवस साजरा करताना दिसतात. झी मराठी वरील लोकप्रिय मालिका “तुझ्यात जीव रंगला” मधील प्रमुख अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच अंजली बाई हीचा पण वाढदिवस गेली दोन-तीन वर्ष आपण पण सेटवरच झालेला पाहिला आहे.
अक्षया तिचा वाढदिवस दरवर्षी दोन वेळा साजरा करते. अक्षया चा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता. त्यामुळे ती दरवर्षी अक्षय तृतीयेला तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा करते आणि त्याच कारणांनी तिचे नाव अक्षया ठेवण्यात आले होते. तसेच तिची जन्मतारीख 13 मे ही असून ती दरवर्षी 13 मे रोजी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरा करते.
Anjalibai birthday या कारणाने आज अक्षयाचा वाढदिवस हा तिथीप्रमाणे आहे. तरीही तिचे फॅन्स तिला दोन्ही वेळेस शुभेच्छा देत असतात. गेले काही वर्ष “तुझ्यात जीव रंगला” च्या सेटवर ती आपला वाढदिवस साजरा करत असते. शूटिंग बंद असल्याने आता तिला वाढदिवस या वर्षी घरी साजरा करावा लागणार आहे.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.