Ankur vadhave latest शरीराने उंची कमी असलेल्या व्यक्तीचं नशीब वाईट असते असे नाही. त्यामुळे बुटक्या माणसाचे भविष्य हे त्यांच्या उंचीवर ठरविता येत नसते, यालाच उदाहरण म्हणून अभिनेता “अंकुर वाढवे” ला घेता येईल. झी मराठी वरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम “चला हवा येऊ द्या” मध्ये अनेक भागात अंकुर अभिनय करताना दिसत असतो.
उंची कमी असल्याने काही लोक खचून जात असतात. कारण, बाकीच्या लोकांसाठी तो एक हस्यबिंदू ठरत असतो. पण अंकुर ने आपल्या कमी उंचीचा फायदा घेत, विनोदी भूमिका साकारण्याकडे लक्ष दिले आहे. Ankur vadhave latest आज त्याच्या धमाल विनोदी अभिनयाचे अनेक चाहते झाले आहेत. “चला हवा येऊ द्या” मध्ये पण तो कोणतीही भूमिका करायला लाजत नाही, यामुळेच तो आज त्याला इतकी प्रसिध्दी मिळाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे अंकुर चे मूळ गाव आहे. “चला हवा येऊ द्या” सोबतच अंकुर मागे “निम्मा शिम्मा राक्षस” या नाटकात देखील काम करीत होता. “तुला पाहते रे” फेम गायत्री दातार ही देखील त्या मालिकेत काम करीत होती.
गेल्या वर्षी अंकुरने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. त्याची पत्नी दिसायला खूप सुंदर दिसते. लग्न झाल्यास त्याने आपल्या पत्नीसोबतचे काही फोटोज् फॅन्स साठी शेयर केले होते. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.