(AntiCorona Movement ) कोरोना व्हायरस ने जगभरात थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर आणि स्वछता राखण्यासाठी लातूर चे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एक नवीन उपक्रम सुरु केलेला आहे, त्याचे नाव आहे “ACP”.
ACP हे दुसर तिसरे कोणी नसून आपल्या घरातीलच लहान मुलांना म्हणलेलं आहे ACP म्हणजेच AntiCoronaPolice. म्हणजेच जर एखादी व्यक्ती घरातून बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीला घरातील लहान मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत. घरातून बाहेर जान गरजेच आहे का ? असेल तर त्यांनी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधला आहे का? व बाहेरून घरी येत असताना त्यांनी हात सेनिटायझेशन केले आहेत का ? असे प्रश्न हे लहान मंडळी विचारतील.
मा.जिल्हाधिकारी साहेबांनी असे आवाहन केले आहे कि आपण सर्व जन या उपक्रमा मध्ये सहभागी व्हावे व त्याचे फोटो व्हीडीओ बनवून आपल्या मित्रांना या उपक्रमा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करावे. या उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वतः पासून केली आहे. त्यांना त्यांच्या घरातील ACP म्हणजेच त्यांची मुलगी शाश्वती त्यांना प्रश्न विचारताना दिसत आहे.
या उपक्रमाचे नाशिकचे आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील साहेबांनी देखील कौतुक केले आहे .हा उपक्रम पुढे चालवावा असे आवाहन केले आहे व त्यांनी देखील त्यांचा व्हिडिओ सोशल मिडिया वर टाकलेला आहे पहा व्हिडिओ ……
माहिती share करायला विसरू नका