dhanshree kadgaonkar latest

Dhanashree kadgaonkar latest झी मराठीवरील “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेतील खलनायकाची भूमिका करणारी नंदिता म्हणजेच धनश्री काढगावकर हिने मालिकेतून स्वतःची वेगळीच छाप पाडली होती. मालिकेत तिने जरी खलनायकेची भूमिका साकारली असली तरी प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले. तिच्या आवाजातील धमक व रुबाबदार व्यक्तिमत्व प्रेक्षकांना खूप आवडले.

Dhanashree kadgaonkar mimicry

मूळची पुण्याची असणाऱ्या धनश्रीचा जन्म 6 एप्रिल 1988 रोजी झाला. “तुझ्यात जीव रंगला” मालिकेमधुन बाहेर पडल्यास नंतर ती नक्की काय करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. परंतु काही दिवसातच ती परत छोट्या पडद्यावर दिसून आली. खलनायिकेच्या च्या भूमिकेतून बाहेर आल्यानंतर काहीतरी वेगळेच करण्याचा प्रयत्न तिने केला. धनश्रीने झी युवा वरील “युवा डान्सिंग क्वीन” या डान्स शोमध्ये सहभाग नोंदविला होता.

dhanashree

धनश्रीचा युवा डान्सिंग क्वीन या शो दरम्यान चा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात धनश्रीचा कोरियोग्राफर गोकुळ पगारे हा तीची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे. ते पाहून धनश्रीला पण हसू आवरता आले नाही. जमिनीवर झोपून ती हसू लागली. या शोमध्ये धनश्री सोबत “गायत्री दातार”, “पूर्वा शिंदे” या अभिनेत्रींचा देखील समावेश होता. हा व्हिडीओ “लागीर झालं जी” मधील जयडीने म्हणजेच पूर्वा शिंदे हिने शूट केला होता.
पाहा व्हिडिओ..

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *