Dhanashri kadgaonkar latest “तुझ्यात जीव रंगला” या झी मराठीवरील मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काढगावकर हिने मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक छोटे मोठे पात्र साकारले होते. “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत धनश्रीने नंदिता हे पात्र उत्तम रित्या साकारले होते. तिने या मालिकेत जरी खलनायकेची भूमिका साकारली असली तरी त्या पात्राला तिने योग्य न्याय दिला होता.

Dhanashri kadgaonkar latest धनश्रीचा जन्म 6 एप्रिल 1988 रोजी पुण्यात झाला. तीचे बालपण पुण्यातच गेले. पुण्यातील गरवारे कॉलेज मध्ये तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि आयएमसीसी या कॉलेज मध्ये पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण घेतले. धनश्रीने “गंध फुलांचा” या मराठी मालिकेत तिने महिमा नावाचे पात्र साकारले होते.

धनश्री काढगावकरने “तुझ्यात जीव रंगला” या मराठी मालिकेत येण्याअगोदर सोनी वाहिनीवरील क्राईम पेट्रोल या सत्य घटनांवर आधारित शो मध्ये तिने खूप सारे एपिसोड्स केले होते. त्यात ती धोकेबाज, राख, दासी अशा काही एपिसोड्स मध्ये दिसून आली होती. यातील काही भागात ती महिलांवरील अत्याचााविरोधात काही पात्र साकारताना दिसली आहे.

धनश्रीचा अभिनय कौशल्य पाहून ती एक अनुभवी आणि कलाक्षेत्रात रुजलेली अभिनेत्री वाटते. तिच्या आवाजातील धमक तिच्या अभिनयाला आणखीन उंचीवर नेऊन ठेवले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणाला मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला न्यायालयाने मालिकेत तिला शिक्षा सुनावली होती. यामुळेच मालिकेतील तीचे पात्र बंद झाले होते. मालिकेतून तिच्या जाण्याने प्रेक्षकवर्गात नाराजी दिसून येत आहे. पण ती “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत लवकरच परत दिसेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
माहिती आवडली तर शेयर करा..