dr megha vyas real सध्या कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त धोका दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि दवाखान्यातील अन्य कर्मचाऱ्यांवर असणे सहाजिकच आहे. आत्तापर्यंत भारतात काही डॉक्टरांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या फेसबुक वर एक पोस्ट व्हायरल होताना दिसून येत आहे, ज्यामध्ये एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला, असे लिहिण्यात आले आहे. पुण्यात डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या मेघा व्यास यांना कोरोनाची झाली होती व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा अशी पोस्ट वायरल होतं आहे. परंतु, याबाबतीत सत्यता समोर आली आहे.
सदरील महिलेचे खरे नाव मेघा व्यास नसून “मेघा शर्मा” आहे. त्यांच्या पतीचे नाव श्रीकांत शर्मा असून ते डॉक्टर आहेत. मेघा शर्मा या पुण्यातील एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होत्या. 22 एप्रिल रोजी मेघा यांचा तीव्र न्युमोनिया मुळे मृत्यू झाला होता. त्यांचे कोरोनाचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, असे त्यांचे पती डॉक्टर श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.
डॉक्टर श्रीकांत शर्मा यांनी खोटी माहिती पसरविणाऱ्याना बजावित म्हटले आहे की माझ्या पत्नीच्या फोटोचा सोशल मीडियावर गैरवापर करण्यात येत आहे. मी सायबर क्राईम डिपार्टमेंटकडे याबद्दलची तक्रार देणार आहे. त्यामुळे कोणीही ही माझ्या पत्नीविषयी खोटी अफवा पसरू नये.
माहिती share नक्की करा