Gayatri Datar Live तुला पाहते रे मालिकेवर प्रेक्षकांचे असलेले अफाट प्रेम पाहून झी मराठी ने ही मालिका परत चालू करण्याचा निर्णय घेतला. परत एकदा मालिका चालू करून देखील मालिकेवर प्रेक्षक वर्ग तितकेच प्रेम करताना दिसून येत आहेत. ज्यावेळी मालिकेचा शेवट झाला होता, त्यावेळी खूप प्रेक्षक मालिकेतील कलाकारांना “तुला पाहते रे – 2” चालू करण्याची विनंती करू लागले होते.
मालिकेत काम करणारे मुख्य कलाकार सुबोध भावे आणि गायत्री दातार यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आज ही मालिकेबद्दल त्यांना प्रेक्षक विचारीत असतात. आज दिनांक 10 एप्रिल रोजी गायत्री दातार लाईव्ह आली होती, तिला लाईव्ह मध्ये अनेक प्रेक्षकांनी तुला पाहते रे मलिकेबद्दल विचारणा केली.
गायत्रीला तुला पाहते रे मधील अविस्मरणीय क्षण विचारला तेंव्हा तीने मालिकेसाठी शूट केलेला पहिला सीन हा अविस्मरणीय असल्याचे सांगितले होते. ज्यावेळी ईशा विक्रांत सरंजामे यांच्या कॉलेज मधील कार्यक्रमासाठी तयार होवून जाते, तो मालिकेसाठी शूट केलेला पहिला सीन होता असे तिने सांगितले. तसेच, सुबोध भावे सोबत परत काम करायला नक्की आवडेल असे देखील तिने सांगितले.पहा व्हिडीओ …
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका