गेल्या काही वर्षांपासून माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका झी मराठीवर प्रसारित होत आहे. या मालिकेने आत्ता पर्यंत अनेक चढ उतार पाहिले आहेत. मालिकेतील मुख्य कलाकार गुरुनाथ(अभिजित खांडकेकर) आणि राधिकाच्या(अनिता दाते) यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी या मालिकेत दाखविण्यात आल्या. गुरुनाथ आपली पत्नी राधिकाला फसवून दुसऱ्या मुलीशी म्हणजेच शनाया सोबत विवाहबाह्य संबध करतो. याला सगळ्याला कंटाळून नंतर राधिका गुरुनाथ पासून विभक्त होते आणि ती पण गुरूला घटस्फोट देऊन तिचा मित्र सौमित्र सोबत विवाह करते.
मालिकेत इतके लफडी करणारा गुरु म्हणजेच अभिजीत खऱ्या आयुष्यात मात्र आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करीत असतो. प्रत्येक वेळी तो त्याचे बायकोवर किती प्रेम आहे हे सोशल मीडियावर दाखवून देत असतो. त्याची पत्नी ही पण अभिनय क्षेत्रात काम करते. दिसायला ती खूपच सुंदर आहे. अभिजित च्या खऱ्या पत्नीचे नाव सुखदा खांडकेकर आहे. एका मालिकेत काम करीत असताना सुखदा ने अभिजित ला फेसबुक वर मेसेज केला. अभिजित ने तिला रिप्लाय दिला आणि तेंव्हापासून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. नंतर अभिजित ने स्वतः तिला लग्नासाठी मागणी केली. दोघांनी 1 फेब्रुवारी 2013 रोजी विवाह केला.
सुखदाने अनेक नाटकात काम केले आहे. तसेच तिने काही चित्रपटात पण काम केले आहे. “बाजीराव मस्तानी” या संजय लीला भन्साळी च्या गाजलेल्या चित्रपटात तिने बाजीरावच्या बहिणीचा अभिनय केला होता. सुखदा ही अभिजीत पेक्षा जास्त सोशल मीडियावर अॅक्टिव असते. मालिकेत अभिजीत कसा जरी असला तरी तो खऱ्या आयुष्यात बायकोवर खूप प्रेम करतो. वाढदिवसानिमित्त सुखदाला खूप साऱ्या शुभेच्छा.
माहिती share करायला विसरू नका