Tula pahate re and Jai Malhar serial restart news कोरोना या भयानक महामारीला संपूर्ण जग सामोरे जात आहे. त्यामुळे संपूर्ण जगात सर्वत्र आर्थिक कार्ये बंद करण्यात आली आहेत. भारतात पण काही वेगळी परिस्थिती नाही. सर्व चित्रपट, मालिकांचे शूटिंग व प्रेक्षपन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही वर्तमानकाळातील मालिकेचे प्रसारण टेलिव्हिजन वर प्रसारित करणे शक्य होत नाही. अशा वेळी मागे होवून गेलेल्या प्रसिद्ध मालिका परत दाखविण्यात येत आहेत.
काही दिवसापासून झी मराठीच्या प्रेक्षकांनी काही जुन्या मालिका परत दाखविण्याची मागणी केली होती. त्यात “आभाळमाया”, “जय मल्हार”, “तुला पाहते रे” या लोकप्रिय मालिकेची मागणी करीत होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा यांच्यावर आधारित “जय मल्हार” आणि अल्पावधीतच प्रेक्षकांना भुरळ घालणारी तुला पाहते रे या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला परत येत आहेत. “जय मल्हार” या मालिकेत खंडोबाची भूमिका “देवदत्त नागे”, म्हाळसा देवीची भूमिका “सुरभी हांडे”, बानाई ची भूमिका “ईशा केसकर” यांनी उत्तमरित्या निभावून मालिकेला लोकप्रिय केलं होते.
“तुला पाहते रे” या मालिकेत “विक्रांत सरंजामे” यांची भूमिका “सुबोध भावे” आणि “ईशा निमकर” ची भूमिका “गायत्री दातार” यांनी साकारली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रसिध्दी मिळवत टीआरपी चे सर्व रेकॉर्ड मोडले होते. या दोन्ही मालिकेला प्रेक्षकांच्या प्रेमापोटी 6 एप्रिल पासून परत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माहिती share करायला विसरू नका