सध्या कोरोना मुळे होणाऱ्या महामारी मुळे जगावर मोठे संकट आले आहे. या व्हायरस मुळे सगळीकडे भीतीचे वातावरण झाले आहे. अशातच गरीब जनतेचे खाण्यापिण्याचे मोठे हाल होत आहेत. अनेक सेवाभावी संस्था देखील गरिबांना अन्न पुरवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
प्रोजेक्ट मुंबई नावाची एक संस्था सध्या अशाच पद्धतीचे कार्य करताना दिसून येते. ही संस्था गरजू लोकांपर्यंत दररोज 75000 खाण्याचे पॉकेट वाटत आहे. या संस्थेसोबत तुला पाहते रे मालिकेतील जयदीप म्हणजेच आशुतोष गोखले हा कार्य करताना दिसत आहे. त्या संस्थेअंतर्गत “खाना चाहिए” हा उपक्रम चालू आहे. एका मित्राकडून आशुतोषला या संस्थेबाबतीत माहिती मिळाली. त्यांने या संस्थेसोबत काम करण्याची इच्छा दाखवली.
आशुतोष या संस्थेमार्फत मुंबई परिसरातील वांद्रे, ओशिवरा, दहिसर, जुहू, गोरेगाव अशा भागातील सर्व गरजूंना अन्न धान्य, फळं वाटप करीत असतो. सरकारी नियमांचे पालन करीतच आशुतोष डिलिव्हरी बॉय चे काम उत्तमरित्या साकारीत आहे. “रंग माझा वेगळा” या मालिकेचे शूटिंग सध्या थांबले असून देखील तो घरी न राहता अशा समाजसेवेसाठी वेळ देत आहे. त्यामुळे त्याचे हे काम कौतुकास्पदच आहे असेच म्हणावे लागेल.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.