जगभरात covid-१९ या विषाणूने थैमान घातल्याने जगभरात सर्वत्र लॉक डाऊन चालू आहे. भारतात पण या लॉक डाऊन ची काटेकोरपणे पालन केले जात आहे. अशातच पोलीस प्रशासनाने देखील कोरोनाबद्दल अफवा पसरविनाऱ्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.
काही दिवसापूर्वी एका मुलीची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. “कोमल मिश्रा” नामक पुण्यातील एका नर्सचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याच्या पोस्ट व्हायरल होताना दिसत होत्या. तसेच भावपूर्ण श्रद्धांजली च्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सदरील मुलगी की जोडमोहा, जि. यवतमाळ येथील असून ती पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती, अशी अफवा पसरविण्यात येत होती.
परंतू, या प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फोटोमधील मुलीचा मृत्यू झाला नसून ती आणखीन जिवंत आहे. पुण्यातील नायडू हॉस्पिटल मध्ये व जोडमोहा या गावात कोमल मिश्रा नावाची कोणतीच मुलगी नाही, हे सिद्ध झाले आहे. मग फोटोतली मुलगी आहे तरी कोण याचा नंतर तपास करण्यात आला. फोटोमधील मुली चे खरे नाव शशिकला ठाकरे असे असून, ती भंडारा जिल्ह्यातील धर्मापुरी येथील रहिवासी आहे. ती एका नर्सिंग होम मध्ये तीन महिन्यापासून काम करीत आहे. तिचा हा फोटो फेसबुक प्रोफाईलवर होता. त्याच फोटोचा कुणीतरी गैरफायदा घेतला कोणीतरी गैरफायदा घेतला, असे तीने सांगितले. याबद्दल तिने पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. माहिती पडताळूनच कोणतीही पोस्ट फॉरवर्ड किंवा शेअर करावे.
जास्तीत जास्त शेयर करा..