Latest Marathi article सध्याची परिस्थिती पाहून सर्वांचे आयुष्य 20 वर्षाने मागे गेले आहे असेच वाटत आहे. कुटुंबांना वेळ देऊ न शकणारे हे जग आता आपल्या परिवारासोबत एकत्र राहत असल्याचे दिसून येत आहे. धावपळीच्या जीवनात सर्वजण पैशाच्या मागे धावत असल्याने कुटुंबांना वेळ देणे शक्य नव्हते. परंतु, कोरोनाच्या भयंकर संकटामुळे आज सर्व कुटुंब एकत्र राहताना पाहायला मिळत आहे.
Latest Marathi article लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्व टीव्ही मालिकांचे शूटिंग थांबले असल्याने सर्व चॅनेल वर जुन्या लोकप्रिय मालिकांचे प्रसारण करण्यात येत आहे. अशातच दूरदर्शन वाहिनीने देखील लोकप्रिय मालिका रामायण, महाभारत, शक्तिमान या दाखवण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व मालिकांना लोकांकडून पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अक्षरशः या मालिकानी अनेक टीआरपी चे रेकॉर्ड मोडून टाकले आहेत.
90 च्या दशकात येऊन गेलेल्या रामायण या मालिकेत काम करणाऱ्या राम-लक्ष्मण-सीता- हनुमान यांना लोकांनी इतकी पसंद केले होते की त्यावेळी ते कुठे बाहेर जरी निघाले तरी लोक त्यांच्या पाया पडत असे. कारण मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी जीव ओतून आपापल्या या पात्राला योग्य न्याय दिला होता. मालिकेतील पुढील अध्यायात भगवान श्रीरामांच्या पुत्रांचे म्हणजेच लवकुश हे पात्र साकारणारे बाल कलाकार हे मराठीच होती.
मालिकेतील “कुश” हे पात्र साकारणारा बाल कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सध्या चॉकलेट बॉय म्हणून ओळख असणारा “स्वप्निल जोशी” हा आहे. स्वप्निल ने साकारलेली ती भूमिका देखील लोकांना खूप आवडली होती. त्याच्यातील अभिनयाची कौशल्य हे त्याला आज मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेता इथपर्यंत आणून ठेवले आहे. तसेच लव ची भूमिका साकारणारा मयुरेश क्षेत्रमाडे हा यांनी नंतर अभिनेता क्षेत्रात जास्त मस्त काम केले नाही. आता सध्या तो परदेशात एका कंपनीमध्ये सीईओ पदावर काम करतो.
माहिती आवडल्यास share करायला विसरू नका