Latest Marathi article 2020 कोरोना या विषाणूंमुळे जगभरात जीवसृष्टीच्या राहणीमानालाच बदलून टाकले आहे. मनसोक्त बाहेर फिरणारी मनुष्य जात ही घरात अडकून पडली आहे आणि जंगलात राहणारे प्राणी मात्र शहरीभागात बेफिकर वावरताना दिसत आहेत.

latest Marathi article

लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत जगभरात अनेक ठिकाणी चक्क जंगलातील अनेक पशू रोड वर आल्याचे व्हिडिओज समोर आले आहेत. हरीण, कांगारू, रानडुक्कर, माकड असे अनेक प्राणी रोड वर दिसून आले आहेत. याला कारण एकच आहे की सध्या सगळीकडे भयानक शांतता पाहून प्राणी पण संभ्रमात पडले असावेत.

latest Marathi article

आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात 2 माकडे एका सोसायटीच्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यातील एक माकड दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्याच्या खिडकी मध्ये येतो आणि तितक्या उंचीवरून चक्क पूल मध्ये उडी मारतो. हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.यापूर्वी तो माकड दुसऱ्या मजल्या च्या गॅलरी मधून उडी मारायला पाहतो पण त्याने स्विमिंग पूलच्या खोलीचा अचूक अंदाज घेऊनच खिडकी मधून उडी मारण्याचा निर्णय घेतला. यावरून असे सिद्ध होते की माकडांचे डोकं पण माणसासारखे चालत असते. त्यानंतर दुसरा पण माकड पोहताना दिसू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *