Lock Down Update

कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गा विरूद्ध लढण्यासाठी संपूर्ण जग शर्तीचे प्रयत्न करीत आहे. भारताने या लढाईत उचललेली पाऊले नक्कीच प्रशंसनीय आहेत. भारतात कोरोना चे जाळे जास्त पसरू नये यासाठी भारत सरकारने वेळोवेळी योग्य निर्णय घेतले आहेत.

Lock Down latest news update by modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या देशांनी केलेली चूक पाहता ती चूक भारतात होणार याची काळजी घेतली. आर्थिक नुकसानीची पर्वा न करता अगोदर देशातील लोकांच्या सुरक्षेचा विचार केला. मोदींनी केलेल्या कार्याची जगभरातील अनेक देशांतून प्रशंसा करण्यात आली.

Lock Down latest news update by modi

मोदींनी सर्वप्रथम 22 मार्च रोजी एक दिवसाचा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. नंतर भरपूर राज्यात 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती बिकट होवू शकते, याचा विचार करून नरेंद्र मोदींनी 21 दिवसाचा लॉक डाऊन वाढवीत 14 एप्रिल पर्यंत केला होता.

Lock Down latest news update by modi

आता मोदींनी आज म्हणजेच 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता निर्णय घेणार होते. यावेळी ते काय बोलतात याकडे सर्व देशाचे लक्ष लागून गेले होते. आज त्यांनी 10 वाजता लाईव्ह येऊन देशाला संबोधित करताना म्हणताना म्हटले, देशातील सर्व लोकांनी संकटाना सामना करीत देशाला वाचविले आहे.

Lock Down latest news update by modi

आज मोदींनी आणखीन एक महत्वाचा निर्णय घेताना म्हटले आहे की लॉक डाऊन चा काळ वाढवून 3 मे पर्यंत करण्यात अाला आहे. तसेच 20 एप्रिल पर्यंत संपूर्ण देशभरात कडक पाळण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. तसेच, ज्या क्षेत्राने 20 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ला कडक पाळतील तिथे 20 एप्रिल नंतर काही सोयी सुविधांची सूट दिली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. तसेच मोदींनी रोजगारी करणाऱ्या लोकांकडे आम्ही प्राथमिक लक्ष देऊ असे देखील त्यांनी सांगितले.


माहिती आवडली तर नक्की शेयर करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.