Rahul makanikar

जगभरात कोरोणाच्या जीवघेण्या विषाणू मुळे जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. भारतात पण अशीच परिस्तिथी असल्याने पोलीस प्रशासनावर जबाबदारी वाढली आहे.

Rahul makanikar

लॉकडाउन काळात सर्वच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच बाहेर पडण्यास परवानगी आहे. त्याशिवाय जर कोणी बाहेर निघत असेल तर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना समज देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठे काठीने मार देत आहेत, कुठे आरतीचे ताट घेऊन ओवळीत आहेत, कुठे गाणे गाऊन समजावीत आहेत, तर कुठे पोलीस कंटाळून पाया पडताना दिसले आहेत.

Rahul makanikar

नागपूर येथील झोन तीनचे उप पोलीस आयुक्त “राहुल माकणीकर” यांनी आता लोकांनी बाहेर पडू नये म्हणून शायरी रुपात लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल माकणीकर ज्या भागात राहतात त्या भागात जास्त करून झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे लोक घरात जास्त काळ न राहता बाहेर येऊन एकत्र जमत असतात. त्यांच्यासाठी व अशाच बाकी लोकांसाठी त्यांनी उत्तमरित्या शायरी म्हटली आहे. पाहा व्हिडिओ

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *