लॉकडाऊन चालू असल्याने सर्व जण करमणूक म्हणून मोबाईल, टीव्ही चा पुरेपूर वापर सर्वजण करीत आहेत. तसेच, करमणूक म्हणून वेगवेगळे ट्रेंड चालत आहेत. मित्र – मैत्रीणींचे फोटो स्टेटस ला ठेवणे, साडीवरील फोटोज् पोस्ट करणे, जुन्या फोटोज् ना कॉमेंट्स करणे असे अनेक ट्रेंड चालू झाले आहेत.
आता आज तर एका नवीनच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे आज सर्वजण एका मुलीची फोटो आपापल्या स्टेटस ला ठेवून तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. खूप जणांनी या मुलीला ओळखले नसेल. कारण ती मुलगी मराठी किंवा बॉलिवुड मधील अभिनेत्री नसून ती एक साऊथ ची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तीचे नाव “रश्मिका मंदाना” आहे. अल्पावधीतच तीने चित्रपटातील अभिनयामुळे खूप प्रसिद्धी मिळविली आहे.
रश्मीका ही मूळची कर्नाटक राज्यातील विराजपेट या गावची आहे. तिचा आज वाढदिवस असून तिचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी झाला. 2014 या वर्षापासून तीने मॉडेलिंग सुरू केली व तीने 2016 रोजी पहिला चित्रपटात कामे केले. या चित्रपटासाठी तीला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभेनित्रीचा पुरस्कार पण मिळाला होता. चित्रपटातील अभिनेता रक्षित शेट्टी सोबत तीने नंतर सगाई केली. परंतू दोघांनी काही कारणाने परत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मधील विजय देव्रकोंडा सोबतचा गीता गोविंदम हा चित्रपट खूपच गाजला.
रश्मीका ही तीच्या चेहऱ्याच्या हावभावामुळे प्रसिद्ध आहे. तीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडिया वर वायरल होत असतात. एक्स्प्रेशन क्वीन म्हणून तीची ओळख आहे. आज तिचा वाढदिवस असल्याने सकाळपासूनच सर्वजण स्टेटस ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
माहिती आवडली तर नक्की शेयर करा.