मुंग्याचा त्रास घराघरात प्रत्येकालाच होत असतो. उन्हाळ्यात जास्त करून मुंग्या येत असतात. मुंग्यांबद्दल एक शगुन सांगायचे म्हणजे लाल मुंग्यांना ओळीत जात असताना मुंग्यांच्या तोंडात अंडी असलेले बघणे शुभ असतं. याने संपूर्ण दिवस शुभ आणि सुखात जातो.कधी लाल मुंग्या तर कधी काळ्या मुंग्या हैराण करुन सोडतात. लाल मुंग्या चावल्यास वेदना होतात आणि मुंग्या वेगवेगळे बॅक्टेरिया सोबत घेऊन फिरतात. ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत त्या घरात मुंग्या पळवण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे फारच धोकादायक ठरु शकतं. त्यावर हे घरगुती उपाय केल्यास मुंग्या सहज बाहेर घालवू शकतो
1) मिठ
मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी मिठ फारच उपयोगी आहे. लादी पुसताना पाण्यात मिठ घाला. त्या मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास मुंग्या घरातून पळून जातात.
2) मिरची पावडर
घरातील ज्या कोपऱ्यात मुंग्यांची संख्या अधिक दिसेल त्या ठिकाणांवर थोडं मिरची पावडर टाका. या उपायामुळेही घरात मुंग्या येणार नाहीत. फक्त मिरची पावडर टाकल्यावर लहान मुलांवर लक्ष द्यावं लागेल.
3) लवंग
घरातील मुंग्या पळवण्यासाठी किंवा मुंग्या घरात येऊ नये यासाठी लवंग फारच फायदेशीर आहे. यासाठी घरात मुंग्या कुठून येतात हे बघण्याचीही तुम्हाला गरज पडणार नाही. घरातील कोपऱ्यांमध्ये, खिडकींमध्ये लवंग ठेवा. त्याने मुंग्या घरात येणार नाहीत.
4) गव्हाचं पीठ
घरात लाल मुंग्या शिरल्यास असतील तर ज्या ठिकाणाहून मुंग्या घरात येत आहेत, त्या ठिकाणी गव्हाचं पीठ टाका. मुंग्यांची रांग दिसेल तर त्यावरही पीठ टाका त्याने मुंग्या निघून जातील.
5) हळद आणि फटकी
घर मुंगीमुक्त करण्यासाठी हळद आणि फटकीची पावडर एकक्ष करुन घरातील कोपऱ्यांमध्ये पसरवून ठेवा.
6) लिंबाची साल
लाल मुंग्यांना कोणत्याही प्रकाराच्या कीटनाशक वापरू नये. आपल्या घरात लिंबू तर असेलच. लिंबाला जरा सोलून म्हणजे काही सालं काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी ठेवून द्यावे. काही वेळातच मुंग्या तिथून नाहीश्या .
माहिती आवडल्यास share करा.