Ritesh deshmukh latest सध्याच्या युगामध्ये स्वतःला फेमस करण्यासाठी युवापिढी ला टिक टॉक चे तुफान वेड लागले आहे. कोणी चित्रपटांतील गाण्यावर, कोणी शायरी वर, कोणी कीर्तनाच्या प्रसिद्ध डायलॉग वर, तर कोणी एखाद्या कॉमेडी सीन वर टीक टॉक व्हिडिओ बनवत असतात.
Ritesh deshmukh latest युवा पिढीचे टिक टॉक ॲप बद्दलच्या प्रेमाला पाहून अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी देखील टिक टॉक वर आपले स्वतःची अकाउंट बनविले आहेत. त्यातच आपली मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे देखील सध्या टिक टॉक वर खूपच ॲक्टिव दिसतात.
सध्या लॉक डाऊन चालू असल्याने रितेश आणि जेनेलिया दोघेही घरात बसूनच एकत्र टीक टॉकच्या व्हिडीओ शूट करीत असतात. मागे अजय देवगनच्या वाढदिवसा दिवशी रितेश देशमुख ने अजयला त्याच्या वेगळ्याच टिक टॉक च्या व्हिडिओ द्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. “मौका मिलेगा तो हम बतायेंगे” अजय देवगनच्या गाण्यावर जेनेलिया आणि रितेशने टिक टोक व्हिडिओ बनवला होता.
काही महिन्यापूर्वी जेनेलियाने “चला हवा येऊ द्या”च्या कॉमेडी सीन वर टिक टॉक व्हिडिओ बनवला होता. आता रितेश देशमुख ने समीर चौघुले च्या चला हवा येऊ द्या मधील एका कॉमेडी सीन वर टिक टॉक व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर खूपच वायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ :