जगभरात कोरोना व्हायरसची भीती असतानाच भारतातील लोकांना एका वेगळ्याच दुःखांना सामोरे जावे लागत आहे. अभिनेता इरफान खान आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनामुळे भारतावर दुःखाचे सावट निर्माण झाले. भारतीय सिनेसृष्टीत या दोघांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.
ऋषी कपूरचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी झाला होता. राज कपूर या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा ऋषी कपूर यांनीदेखील कपूर खानदानाचा अभिनयाचा वारसा पुढे ठेवला. एकेकाळी एका पाठोपाठ एक अनेक चित्रपट झाली होते. “बॉबी”, “चांदणी”, “प्रेमरोग”, “सागर”, “हिना”, “नगीना”, “प्रेमग्रंथ”, “बोल राधा बोल” अशा ब्लॉकबस्टर चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. ऋषी कपूर हे ट्विटर चालविण्यात भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी होते, हे सर्वांनाच माहिती आहे.
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियर ज्यावेळी प्रकाशझोतात आली होती त्यावेळी ऋषी कपूर यांनी तिच्याबद्दल हटके अंदाजात ट्विट केले होते. प्रियाचं डोळा मारलेला तो सिन ज्यावेळेस व्हायरल झाला होता त्यावेळी ऋषी कपूर यांनी असे म्हटले होते. “ही मुलगी खूप प्रसिद्ध होईल, मी तरुण असताना तू का आली नव्हती?” अशा थट्टा मस्करीत ऋषी कपूर ने प्रिया बद्दल ट्विट केलं होतं.
आज प्रियाने त्या क्षणाची आठवण करताना भावूक शब्दात लिहिले. “मला त्यांच्या या शब्दांनी खूप प्रेरणा दिली होती, काश मी तुमच्या तरुण वयात आली असते आणि काश मी तुम्हाला एकदाच भेटू शकले असते”, असे लिहीत प्रियाने ऋषी कपूर यांना श्रद्धांजली दिली. ऋषी कपूरला मर्दमराठी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.