आज क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा “सचिन रमेश तेंडुलकर” या या महान व्यक्तीचा जन्मदिवस आहे. 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेला सचिन आज 47 वर्षाचा झाला आहे. त्याने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये असे काही अनोखे पराक्रम केले आहेत जे कोणत्याही क्रिकेटपटूला तिथपर्यंत पोहोचणे अशक्य असेच आहे.

sachin tendulkar special

सचिनने अनेक सामन्यात भारतीय क्रिकेटला संकटातून बाहेर काढले आहे. त्याचेच उदाहरण त्याने 1999 च्या इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये दिले होते. त्या वर्ल्डकप मध्ये भारताने पहिला सामना साऊथ आफ्रिके सोबत हरला होता. दुसरा सामना 19 मे 1999 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध होणार होता. परंतु त्याच दिवशी त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाल्याने त्याला मायदेशी परतावे लागले.

sachin tendulkar special

19 मे दिवशीच्या झिम्बाब्वे विरुद्धचा सामना भारताने फक्त 3 धावाने हरला व त्यामुळे भारत वर्लडकप मधून बाहेर पडणार याची शक्यता होती. कारण वर्ल्डकप मध्ये टिकून राहण्यासाठी भारताला पुढील तीन सामने जिंकणे गरजेचे होते. त्यामुळे सचिन तेंडुलकर टीम मध्ये असणे गरजेचे होते. वडिलांचे अंत्यविधी आवरून सचिन जास्त वेळ भारतात न थांबता लगेच इंग्लंडला गेला.

sachin tendulkar special

केनिया विरूद्ध 23 मे 1999 रोजी झालेल्या करो वा मरो सामन्यासाठी सचिन उपस्थित राहिला. त्याने त्या सामन्यात 101 चेंडूत नाबाद 139 धावा काढत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला व सुपर सिक्स साठी भारताच्या आशा कायम ठेवल्या. एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनचे ते 22 वे शतक होते. त्या सामन्यात शतक झळकवल्यानंतर सचिनला आणि जगभरातील अनेक क्रिकेटरसिकांना डोळ्यातले अश्रू आवरता आले नव्हते. अशा या भारतीय क्रिकेट मधील संकटमोचकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माहिती आवडली तर नक्की शेयर करा..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *