काही वर्षांपूर्वी एक मराठी मुलगी आपल्या चेहऱ्याच्या हावभाव नी अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या शिल्पा ठाकरे ला सर्व युवा पिढी ओळखते. सुरुवातीला तीच्या टिक टॉक वरील व्हिडिओ ला सर्वांनी खूपच व्हायरल केले होते. तेंव्हा पासूनच ती प्रकाशझोतात आली होती.
22 ऑक्टोबर 1996 रोजी शिल्पा ठाकरे चा जन्म झाला. शिल्पा मूळची नागपूर ची आहे. तीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ज्यावेळी टिक टॉक हे ऍप्लिकेशन भारत आले होते, तेंव्हा या अभिनेत्रीने स्वतःचे टिक टॉक बनविले होते. “विचार काय हाय तुमचा”, “पहला पहला प्यार है”, “ना ना करते प्यार”, अशा अनेक गाण्यावरील तीचे टीक टॉक व्हिडिओज खूप व्हायरल झाले होते.
शिल्पा ठाकरे ला भेटलेली प्रसिध्दी पाहून नंतर तिला अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. इभ्रत, ट्रीपल सीट, खीचिक, परफ्यूम, राडा, झांग्या अशा अनेक मराठी चित्रपटात ती झळकली होती. आता शिल्पा तिच्या योगाच्या व्हिडिओज मुळे चर्चेत आली आहे.
सध्या लॉक डाऊन असल्याने ती तीच्या नागपूर येथील घरीच राहत आहे. घरी राहून तिने आपल्या फॅन्ससाठी योगा चे काही व्हिडिओज शेयर केले आहे, त्यात ती अनेक योगा करताना दिसून येत आहे.
पाहा व्हिडिओ :