एखाद्या कलाकाराला प्रसिद्धी मिळण्यासाठी फक्त एका प्लॅटफॉर्मची गरज असते. एकच प्लॅटफॉर्म कोणत्याही कलाकाराचे नशीब बदलू शकतो. बॉलीवुडची स्टार सिंगर श्रेया घोषाल हिच्या बाबतीत पण तसेच काहीतरी घडले. श्रेया घोषाल हिने 2000 वर्षात “सा रे ग म” या गाण्याच्या शोमध्ये भाग घेतला. त्या शो मुळेच ती खूपच प्रसिद्ध झाली व तीने तो जिंकला देखील.
सारेगमप चा किताब जिंकून श्रेयाला एका वर्षांनंतरच बॉलीवूड मध्ये प्लेबॅक करण्याची संधी भेटली. 2002 मध्ये आलेला “देवदास” या गाजलेल्या चित्रपटासाठी श्रेयाने पहिल्यांदाच गाणे गायले होते. इथूनच श्रेया घोषाल बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध गायिका बनण्याच्या वाटेकडे निघाली व आज ती आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते. दरम्यान 2005 वर्षापासून तिला एक मुलगा आवडत होता. त्या मुलाचे नाव शीलादित्य मुखोपाध्याय हे होते.
दोघांची मैत्री दहा वर्ष असेच चालू राहिली. नंतर दोघांनी 6 फेब्रुवारी 2015 रोजी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. तिने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये नवऱ्याला संबोधित करताना असे लिहिले होते की, “तू त्यावेळेस एक मुलगा आणि एक मुलगी होते. आपण शाळेमध्ये एका अनोळखी सारखे भेटलो. जेव्हा असा एक वेळ आला ज्यावेळी आपल्याला दिमाखाने निडर बनविले. ज्या प्रेम कहानी ना मी पुस्तकामध्ये चित्रपटामध्ये पाहत होती, तेच माझ्या खऱ्या आयुष्यात उतरत होते आणि हे तुला भेटूनच शक्य झाले, हे आता मी खरे सांगते”
श्रेया घोषाल चा नवरा इंजिनिअर असून पॉईंटशेल्फ या डिजिटल पेमेंट ॲपचा फाउंडर आहे. तसेच हीपकास्क या मोबाईलचा को – फौंडर आहे. दोघांनी दहा वर्षे प्रेम टीकवत शेवटी लग्न केले. श्रेया घोषाल ने देखील इतके प्रसिद्ध होऊन देखील त्यांची साथ सोडली नाही. तीने अनेक भाषेतील गाणे गायले असून त्यात तिने अनेक मराठी गाणी देखील गायली आहेत.
माहिती आवडली तर नक्की शेअर करा