subodh bhave latest  सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये सर्वजण आपापल्या घरातच बसून आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून मित्रपरिवार यांच्या सोबत कोणाची भेट गाठ होत नाहीये. अशातच सर्वजण घरी तर राहून काहीना काही करीत वेळ घालवीत आहेत.

subodh bhave latest

अनेक अभिनेते-अभिनेत्री रोज सोशल मीडियावर कुठे ना कुठे लाईव्ह येताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने सध्या एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. स्पृहा “खजिना” नावाचा एक उपक्रम सोशल मीडियावर चालवीत आहे. ज्यामध्ये ती प्रेक्षकांना करमणुक होण्यासाठी अनेक मोठमोठ्या कलाकारांना तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह बोलवीत असते.  subodh bhave latest  यावेळी तिने महाराष्ट्राचा सुपरस्टार सुबोध भावे याला बोलविले होते. सुबोधने काही कविता व काही सामाजिक बाबीवर भाष्य करून या गप्पांच्या मैफलीला चार चाँद लावले.

subodh bhave latest

लॉकडाऊनच्या काळात सध्या परिस्थिती ही “वि दा करंदीकर” यांच्या “तेच ते न् तेच ते” या कवितेला समान आहे, असे सुबोध भावे यांनी म्हटले. सुबोध भावे यांना पुस्तके वाचण्याची आवड आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यातच त्यांना महान पुरुषांवर तसेच ऐतिहासिक पुस्तके वाचण्यात जास्त आनंद मिळतो. सुबोध भावे यांनी म्हटलेल्या विंदा करंदीकर यांच्या कवितेचे चार ओळी अशा आहेत..
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते
-विंदा करंदीकर

पाहा व्हिडिओ…

मअहिती share करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *