subodh bhave work from home संपूर्ण देशभरात लॉकडाऊन ची परिस्तिथी चालू असल्याने सर्वजण घरातच अडकून पडले आहेत. त्यात उद्योजक, सेलिब्रिटी, क्रीडा विश्वातील सर्वच लोकांचा समावेश आहे.
बाहेरची कोणतीही व्यक्ती घरामध्ये येऊ शकत नसल्याने अनेक कलाकारांच्या घरचे नोकरदार वर्ग कामासाठी येणे बंद झाले आहे. अशातच घरातील सर्व कामे स्वतः या कलाकारांना करावी लागत आहेत. त्यात मराठी कलाकारांसह अनेक बॉलिवुड कलाकार देखील घरातील सर्व कामे स्वतः करीत आहेत. पुरुष कलाकार देखील घरातील सर्व कामे स्वतः करीत असल्याचे दिसून येत आहे. झाडून काढण्यापासून ते स्वयंपाक करणे, भांडी घासणे हे देखील कामे करताना पुरुष मंडळी दिसून येत आहेत.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे हे देखील पत्नी मंजिरी भावे व मुलांसोबत सोबत कशा प्रकारे वेळ घालवीत आहेत हे वारंवार सोशल मीडियावरून सांगत असतात. मागेही त्यांनी घर स्वच्छ करीत असल्याच्या काही फोटोज् पोस्ट केल्या होत्या. आज त्यांनी एक फोटो केली होती, ती फोटो त्यांच्या खिडकी बाहेरील होती व त्यात माकडे दिसत आहेत. त्या फोटोला मधूरास रेसिपी या प्रसिद्ध मराठमोळ्या युट्यूबर नी “हाहाहा” अशी कमेंट केल्या होत्या. त्याला सुबोध भावे यांनी असा रिप्लाय दिला, “तुमच्याकडून मार्गदर्शन घेणं सुरू आहे सध्या आमच्या घरी”. म्हणजेच सुबोध भावे यांच्या घरातील पदार्थ हे मधुरा यांच्या रेसिपी पाहूनच बनविले जात आहेत.सुबोध भावे यांचा रिप्लाय पाहून मधुरा यांनी त्या रिप्लाय ची स्क्रीनशॉट काढून आपल्या स्टेटस मध्ये ठेवली व सोबत लिहिले, “Subodh’da made my day.” …
माहिती share करायला विसरू नका …………………..