आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय मालिकेमध्ये झी मराठीच्या “जय मल्हार” या मालिकेचा समावेश होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा वर आधारित ही मालिका 18 मे 2014 रोजी सुरू झाली होती. या मालिकेचे निर्माते मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे हे होते. या मालिकेत देवदत्त नागे यांनी खंडोबाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. सुरभी हांडे हिने म्हाळसा देवीची भूमिका साकारली होती. बानाईच्या भूमिकेत ईशा केसकर ही दिसून आली होती. आज आपण म्हाळसा देवीची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडे बद्दल थोड जाणून घेऊयात.
सुरभीचा 20 मे 1991 ला जळगाव येथे झाला होता. तीचे बालपण जळगाव या शहरातच झाले होते व ती तिथेच मोठी झाली. इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण तीने जळगाव येथेच पूर्ण केले. नंतर तीने पुढील शिक्षणासाठी नागपूरला गेली व तिथून तिने ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सुरभी अवघ्या 16 वर्षाची असताना “स्वामी” या नाटकातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.
खरे तर तिला खरे यश जय मल्हार या प्रसिद्ध मालिकेतून मिळाले होते. म्हाळसादेवी च्या भूमिकेला तीने योग्य न्याय दिला असेच म्हणता येईल. या भूमिकेमुळे तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ती नंतर “अग्ग बाई अरेच्चा 2” या चित्रपटातून दिसून आली. तसेच “लक्ष्मी सदैव मंगलम” या मालिकेत देखील सुरभीने उत्तम अभिनय केला होता.
2 वर्षापूर्वी म्हणजेच ऑगस्ट 2018 मध्ये सुरभीने दुर्गेश कुलकर्णी या व्यक्तीसोबत साखरपुडा केला. सुरभी आणि दुर्गेश यांच्यात अगोदरपासूनच मैत्रीचे नाते होते. दोघांच्या या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व नंतर दोघे फेब्रवारी 2019 मध्ये लग्नाबंधनात अडकले. त्यावेळी दोघांच्या लग्नाच्या फोटोज् सोशल मीडिया वर व्हायरल होत गेल्या. सुरभी व दुर्गेश या दोघांना वैवाहिक आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
मराठी कलाकारांचा कोरोना विरूद्ध लढाईचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
जय मल्हार मध्ये सुरभी सहित अन्य सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्याने सध्या ही मालिका परत प्रदर्शित करण्यात येत आहे. माहिती आवडली तर नक्की शेयर करा..