Yogita Gavali Marriage photos जगभरात कुविख्यात गँगस्टर म्हणून प्रसिद्ध असेलेले महाराष्टातील अरुण गवळी सर्वांनाच माहिती आहेत. याच अरुण गवळीच्या मुलीचा आज दिनांक 8 मे रोजी विवाह संपन्न झाला आहे. अरुण गवळी च्या मुलीचे नाव योगिता गवळी आहे. दगडी चाळ येथे दोघांचा विवाह झाला. योगिताचा विवाह हा मराठी अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासोबत झाला. योगिता आणि अक्षय यांचा विवाह दगडी चाळ येथे अगदी खाजगी पद्धतीने झाला असून लग्नाला मोजकेच नातेवाईक आणि काही मित्रपरिवार उपस्थित होते.
अक्षय वाघमारे या अभिनेत्याने मराठी मालिका आणि काही चित्रपटात पण काम केले आहे. फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी अशा अनेक उत्तम चित्रपटात अक्षय ने काम केले आहे. ती फुलराणी, गुलमोहर मालिकेमध्ये पण अक्षय ने काम केले आहे. योगिता ही राजकारणात सक्रिय असते. योगिता व अक्षय हे गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. शेवटी दोघांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी पुण्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.
अनेक मर्डर केस मध्ये गुन्हेगार असलेल्या अरुण गवळी यांच्या मुलीचा विवाह असल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्यावर काही चित्रपट पण काढण्यात आले आहेत. त्यात दगडी चाळ हा मराठी चित्रपट व डॅडी हा हिंदी चित्रपट यांचा समावेश आहे.
नाशिक तुरुंगातून बेलवर अरुण गवळी बाहेर आले आहेत. सध्या लॉक डाऊन असल्याने त्यांनी मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांची लग्नासाठी विशेष परवानगी घेतली होती. विवाह पण सर्व नियम पाळून करण्यात आला.
माहिती आवडली तर शेयर करा