गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील एक व्यक्ती जो रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार, मतिमंद लोकांना घेऊन जाऊन त्यांचे पालन-पोषण करायचा. त्या मुलाचे नाव अक्षय बोऱ्हाडे आहे. अनाथांचा कैवारी म्हणून गेली काही वर्ष अक्षय प्रसिद्ध आहे.

Akshay borhade

शिवऋण युवा प्रतिष्ठान चा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रभर फिरत असताना वाटेत कोणीही भिकारी किंवा मनोरुग्ण दिसला तर तो त्यांना घेऊन आपल्या गावी जात असे. गावी नेऊन त्यांचे व्यवस्थित पालनपोषण करायचा. परंतु, अशी समाजसेवा करणाऱ्या अक्षयला काही लोकांनी मारहाण केल्याचे उघड झाले आहे. अक्षय ने राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

Akshay borhade

मारहाणीचे खरे कारण आणखीन कळू शकले नसले तरी सत्यशील शेरकर याने मात्र तोंड उघडले आहे. अक्षयच्या घरातील मनोरुग्ण व्यक्तींपैकी एकाला कोरोनाची लागण असल्याने त्याला पुणे येथे पाठविण्यास आम्ही त्याला सांगितलं. कारण ते मनोरुग्ण गावात सर्वत्र फिरत असतात. उलट अक्षयनेच आम्हाला शिवीगाळ केली, असे सत्यशील शेरकरने म्हटले आहे. परंतू अक्षयने त्याच्या घरातील सीसीटिव्ही फुटेज चेक करण्याची विनंती केली आहे. अक्षयच्या या व्हिडिओ मुळे वातावरण खूपच तापले असून सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे.
पाहा व्हिडिओ :


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *